शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Video: राम मंदिर सोहळ्यादिनीच ब्रिटीश पंतप्रधानांनी गायलं राम भजनं?; जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 17:07 IST

ब्रिटीश पंतप्रधान आणि भारताचे जावई ऋषी सुनक हे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिनी लंडनमधील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.

अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याचे जगभरात थेट प्रक्षेपण झाले. देशाबाहेर असलेल्या अनिवासी भारतीयांनीही २२ जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात उत्स्फुर्तपणे सहभाग घेत आनंदोत्सव साजरा केला. अयोध्येत या सोहळ्यासाठी दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली. तर, लाखो भाविकांनी अयोध्या नगरी फुलून गेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मोदींनी भारताला सक्षम आणि राम राष्ट्र बनविण्याचा संकल्प बोलून दाखवला. या सोहळ्याचा देशभरात आणि देशाबाहेरही उत्साह होता. त्यातच, आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

ब्रिटीश पंतप्रधान आणि भारताचे जावई ऋषी सुनक हे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिनी लंडनमधील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी, रघुपती राघव राजाराम, पतीत पावन सीताराम हे भजन त्यांनी गायल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओत ते हे भजनगीत गाताना दिसून येत आहेत. त्यांच्यासमवेत त्यांची पत्नी अक्षता मूर्ती आणि दोन कन्याही दिसून येत आहेत. मात्र, त्यांचा हा व्हिडिओ राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिनीचा म्हणजेच २२ जानेवारी २०२३ रोजीचा नसून गतवर्षीच्या दिवाळीतील असल्याचं स्पष्ट होत आहे. 

प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने सोमवारी अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअरवर श्रीरामाचे फोटो आणि अयोध्येतील भव्य राम मंदिराचे थ्रीडी पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. तसेच रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी रविवारी न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ राम मंदिर’च्या सदस्यांनी लाडू वाटून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. मात्र, लंडनमधील कुठल्याही कार्यक्रमात पंतप्रधान ऋषी सुनक सहभागी झाले नव्हते. त्यांचा हा व्हिडिओ जुना आहे.  युकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पत्नी अक्षता मूर्तीसमवेत वेदीक सोसायटीमधील हिंदू मंदिरात जाऊन, रघुपती राघव राजाराम हे भजनगीत गायलं होतं. त्यावेळी, त्यांच्या दोन्ही मुली कृष्णा आणि अनौष्का याही सहभागी झाल्या होत्या. लंडनमधील १० डाऊनींग स्ट्रीटवरील पंतप्रधानांच्या घरी पहिल्यांदाच दिवाळी साजरी करण्यात आली होती. त्याचवेळी, दिवाळीनिमित्ताने ऋषी सुनक यांनी येथील वेदिका सोयाटीतील कार्यक्रमात जमिनीवर बसून रामभजन गायलं होतं. त्यांचा तोच व्हिडिओ २२ जानेवारीचा व्हिडिओ म्हणून सोशल मीडियावर चुकीच्या आशयाने शेअर केला जात आहे. सुनक यांचा तो व्हिडिओ २०२३ मधील दिवाळीचा आहे. 

अयोध्येत दर्शनासाठी भाविकांची गर्दी

अयोध्येतील भव्यदिव्य मंदिरात रामलला विराजमान झाले आहेत. त्यानंतर आज पहिल्याच दिवशी पहाटे राम मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. अगदी चेंगराचेंगरी सारखी स्थिती आहे. दरम्यान, सोमवारी पार पडलेल्या श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरात तसेच परदेशातही उत्साहाचे वातावरण होते. याच पार्श्वभूमीवर दुबईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीवर प्रभू रामाचे पोस्टर झळकवण्यात आल्याचेही व्हिडिओ प्रसारीत होत आहेत. मात्र, याबाबतही अद्याप कुठलीही खात्रीशीर माहिती नाही. 

टॅग्स :Rishi Sunakऋषी सुनकAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर