शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 11:50 IST

Canada Mark Carney on Hardeep Singh Nijjar Case: पंतप्रधान नरेंद्र मोदी ५१ व्या जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडा ...

Canada Mark Carney on Hardeep Singh Nijjar Case: पंतप्रधान नरेंद्र मोदी ५१ व्या जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडा दौऱ्यावर होते. या शिखर परिषदेव्यतिरिक्त पंतप्रधानांनी अनेक नेत्यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी विविध मुद्द्यांवर शिखर परिषदेदरम्यान चर्चा केली. यादरम्यान, दोन्ही देश उच्चायुक्तांना पुन्हा नियुक्त करतील असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत, दोन्ही नेत्यांनी व्यापारावरील चर्चा पुन्हा सुरू करण्यावरही चर्चा केली. त्यानंतर आता खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. बैठकीनंतर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी याबाबत भाष्य केलं.

जी-७ शिखर परिषदेदरम्यान दोन्ही देशांमधील संबंध बिघडवणारा निज्जरच्या हत्येच्या मुद्दाही उपस्थित करण्यात आला, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी काहीही बोलताना काळजी घेणे आवश्यक असल्याचे म्हटलं.  कनानास्किस येथे पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या भेटीदरम्यान निज्जर प्रकरणावरील प्रश्नाला उत्तर देताना कॅनडाचे पंतप्रधान कार्नी यांनी महत्त्वाचे विधान केले.

एका पत्रकाराने कार्नी यांना हरदीप सिंग निज्जर प्रकरणाची पंतप्रधान मोदींसोबत चर्चा झाली का? असा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना, "आम्ही केवळ संवादच नाही तर कायदा अंमलबजावणी पातळीवर थेट सहकार्याचे महत्त्व यावर चर्चा केली. आंतरराष्ट्रीय दडपशाहीचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला. हे प्रकरण आता न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने, मला अधिक भाष्य करताना सावधगिरी बाळगावी लागेल," असं पंतप्रधान कार्नी म्हणाले.

कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारतीयांचा सहभाग असल्याचे आरोप केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. त्यानंतर आता पंतप्रधान कार्नी यांनी या मुद्द्याबाबत सावधगिरीची भूमिका घेतली आहे.

खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर याची २ वर्षांपूर्वी १८ जून २०२३ रोजी संध्याकाळी कॅनडातील सरे शहरातील गुरुद्वारातून बाहेर पडताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येवर कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी थेट भारत सरकारवर निज्जरच्या हत्येत सहभागी असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारताने आपले उच्चायुक्त आणि इतर ५ राजदूतांना कॅनडातून परत बोलावले होते. दरम्यान, मार्क कार्नी पंतप्रधान झाल्यानंतर, खलिस्तानी लोकांनी अलीकडेच कॅनडामध्ये हिंदूविरोधी रॅली काढली होती.  

टॅग्स :CanadaकॅनडाNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत