शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 02:58 IST

बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहिद हुसेन यांनी गुरुवारी (२६ जून २०२५) बांगलादेश, चीन आणि पाकिस्तान आघाडीची शक्यता फेटाळून लावली...

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस, सध्या भारतासोबत निर्माण झालेले वाईट संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान युनूस सरकारने पाकिस्तान आणि चीनला मोठा धक्का दिला आहे. बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहिद हुसेन यांनी गुरुवारी (२६ जून २०२५) बांगलादेश, चीन आणि पाकिस्तान आघाडीची शक्यता फेटाळून लावली.

बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, नुकतीच झालेली तिन्ही देशांतील बैठक राजकीय नव्हती. या बैठकीचा हेतू, भारताला बाजूला सारणे असा होता का? असे विचारले असता, तौहीद हुसेन म्हणाले, मी खात्री देतो की, भारताला लक्ष्य म्हणून, असे काही केलेले नाही.

बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वी एका निवेदनात म्हटले होते की,  बांगलादेश, चीन आणि पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी कुनमिंग येथे चीन-दक्षिण आशिया प्रदर्शन आणि चीन-दक्षिण आशिया सहकार्य मंच संदर्भात बैठक केली होती. चीन आणि पाकिस्तानने या बैठकीसंदर्भात स्वतंत्र निवेदनही जारी केले होते. "या बैठकीत तिन्ही पक्षांमधील सहकार्यावर विस्तृत चर्चा झाली आणि चांगले शेजारी म्हणून पुढे जाण्याचे ठरले, असे चीनने म्हटले होते. तर पाकिस्तानने, बांग्लादेश-चीन-पाकिस्तान यांच्यात तयार झालेला एक गट, असे म्हटले होते. याशिवाय, बांगलादेशचे तौहीद हुसैन म्हणाले होते की, बैठकीत प्रामुख्याने कनेक्टिव्हिटी आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाली.

भारतासोबतचे संबंध चांगले करण्याची बांगलादेशची इच्छा -यावेळी तौहीद हुसैन म्हणाले, आपण सत्य स्वीकारायला हवे. भारत आणि मागील सरकार (पदच्चूत पंतप्रधान शेख हसीना) यांचे ज्या प्रकारचे संबंध होते आणि ज्या प्रकारचे संबंध भारताने प्रस्थापित केले होते, त्या प्रकारचे संबंध आता नाहीत. एका प्रश्नाच्या उत्तर देत ते म्हणाले, जर भारताने बांगलादेश आणि नेपाळसोबत, अशी बैठक केली, तर ढाकाही यासाठी तयार आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशchinaचीनPakistanपाकिस्तान