इस्राइलवर रॉकेटचा मारा करून घडवला होता विध्वंस, हमासच्या कमांडरचा IDF कडून खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 20:30 IST2023-10-22T20:29:48+5:302023-10-22T20:30:19+5:30
Israel Hamas War: हमासच्या दहशतवाद्यांनी इस्राइलवर केलेल्या क्रूर हल्ल्यानंतर इस्राइलकडून हमासचे वर्चस्व असलेल्या गाझापट्टीवर जोरदार प्रतिहल्ला करण्यात येत आहे. गाझापट्टीमध्ये इस्राइली लष्कर आणि हवाईदलाकडून हमासचे दहशतवादी आणि त्यांच्या तळांना सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे.

इस्राइलवर रॉकेटचा मारा करून घडवला होता विध्वंस, हमासच्या कमांडरचा IDF कडून खात्मा
हमासच्या दहशतवाद्यांनी इस्राइलवर केलेल्या क्रूर हल्ल्यानंतर इस्राइलकडून हमासचे वर्चस्व असलेल्या गाझापट्टीवर जोरदार प्रतिहल्ला करण्यात येत आहे. गाझापट्टीमध्ये इस्राइली लष्कर आणि हवाईदलाकडून हमासचे दहशतवादी आणि त्यांच्या तळांना सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. दरम्यान, इस्राइलच्या हवाई दलाने एअरस्ट्राइक करून हमासच्या रिजनल आर्टिलरीचा डेप्युटी हेड मुहम्मद कटमश याला ठार केले आहे. मुहम्मद हा सेंट्रल कॅम्प ब्रिगेडमध्ये फायर आणि आर्टिलरी मॅनेजमेंटचे कामकाज मुहम्मद कटमश याच्याच खांद्यावर होती. गाझापट्टीमधून इस्राइलवर होणाऱ्या हल्ल्याच्या योजनांमध्ये त्याचाच सहभाग होता.
याआधी शनिवारी रात्री इस्राइलने गाझामध्ये हमासच्या दोन दहशतवाद्यांच्या घरांवर हल्ला केला होता. त्यात हे दोन्ही दहशतवादी मारले गेले होते. यादरम्यान, इस्राइल डिफेन्स फोर्सेसच्या प्रवक्त्याने मोठा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, हिजबुल्लाह खूप भयानक खेळ खेळत आहे. तो खेळ लेबेनॉनला एका अशा युद्धात ढकलू शकतो, ज्यातून त्याला काहीच मिळणार नाही.
लेफ्टनंट कर्नल जोनाथन कॉनरिकस यांनी रविवारी एक्सवर लिहिलं की, लेबेनॉनचे नागरिक खरोखरच गाझामध्ये दहशतवाद्यांसाठी आपलं सार्वभौमत्व धोक्यात घालण्यासाठी तयार आहेत का? सीएनएनच्या रिपोर्टनुसार कॉनरिकस यांनी सांगितलं की, हिजबुल्लाह इस्राइल आणि लेबेनॉन यांच्यादरम्यान, उत्तर सीमेजवळ इस्राइलच्या ठिकाणांवर हल्ला करत आहे. तसेच परिस्थिती बिघडवत आहे. हिजबुल्लाहच्या गोळीबारामुळे काही नागरिक आणि सैनिकांचा मृत्यू झाला आहे. आयडीएफने अशी काही उदाहरणं पाहिली आहेत की, जिथे हिजबुल्लाहने जाणूनबुजून संयुक्त राष्ट्राच्या ठिकाणांवरही जवळून गोळीबार करून शांती सैनिकांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे.