सापडलेल्या जॅकेटचा स्फोटाशी संबंध?

By Admin | Updated: November 25, 2015 00:07 IST2015-11-25T00:07:16+5:302015-11-25T00:07:16+5:30

एका सफाई कर्मचाऱ्याला सापडलेले जॅकेट त्या जॅकेटशी मिळतेजुळते आहे, जे पॅरिस स्फोटात वापरले गेले होते. यावरून असा अंदाज बांधला जात आहे की,

Detected jacket blast connection? | सापडलेल्या जॅकेटचा स्फोटाशी संबंध?

सापडलेल्या जॅकेटचा स्फोटाशी संबंध?

ब्रुसेल्स : एका सफाई कर्मचाऱ्याला सापडलेले जॅकेट त्या जॅकेटशी मिळतेजुळते आहे, जे पॅरिस स्फोटात वापरले गेले होते. यावरून असा अंदाज बांधला जात आहे की, एक तर संशयिताने खराब असल्याकारणाने हे जॅकेट फेकून दिले असावे किंवा अतिरेकी कारवाया मध्येच सोडून हा संशयित पळून गेला असावा.
फ्रान्सच्या पोलिसांनी सांगितले की, पॅरिसच्या दक्षिण किनाऱ्यावर एका ढिगाऱ्याजवळ हे जॅकेट सापडले. हे जॅकेट अशा ठिकाणी सापडले आहे जिथे एका संशयिताचा मोबाईल मिळाला होता. बेल्जियमच्या पंतप्रधानांनी आठवडाभरासाठी अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन केलेले असताना हे जॅकेट सापडले आहे, हे विशेष.

Web Title: Detected jacket blast connection?