ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोगाची मागणी; शपथेचे उल्लंघन केल्याचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 04:10 AM2019-10-11T04:10:58+5:302019-10-11T04:15:01+5:30

न्यू हॅम्पशायरमध्ये एका निवडणूक रॅलीत बोलताना बाइडेन म्हणाले की, अमेरिकेच्या इतिहासात कोणत्याही अध्यक्षांनी या प्रकारचा व्यवहार केला नव्हता. ट्रम्प यांनी आपल्या कृतीतून स्वत:ला आरोपी केले आहे.

Demands impeachment against Trump; Accused of violating oath | ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोगाची मागणी; शपथेचे उल्लंघन केल्याचा ठपका

ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोगाची मागणी; शपथेचे उल्लंघन केल्याचा ठपका

googlenewsNext

वॉशिंग्टन : व्हाईट हाऊसवर कब्जा करणारे अध्यक्ष ट्रम्प हे लोकशाहीसाठी धोका आहेत, अशी टीका करताना अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष तथा डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे दावेदार जो. बाइडेन यांनी ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग चालविण्याची मागणी केली
आहे. ट्रम्प यांनी पदाच्या शपथेचे उल्लंघन केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
न्यू हॅम्पशायरमध्ये एका निवडणूक रॅलीत बोलताना बाइडेन म्हणाले की, अमेरिकेच्या इतिहासात कोणत्याही अध्यक्षांनी या प्रकारचा व्यवहार केला नव्हता. ट्रम्प यांनी आपल्या कृतीतून स्वत:ला आरोपी केले आहे. न्यायाच्या मार्गात अडथळा आणून काँग्रेसच्या तपासाला सहकार्य करण्यास नकार देऊन त्यांनी स्वत:ला दोषी सिद्ध केले आहे. तथापि, ट्रम्प यांनी या आरोपाचा इन्कार केला आहे.
बाइडेन यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक स्वरूपात ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालविण्यासाठी प्रतिनिधी सभेमध्ये डेमोक्रॅट नेत्यांचे समर्थन करताना म्हटले आहे की, अमेरिकी जनता हे पाहू शकते की, ट्रम्प यांनी शपथेचे उल्लंघन केले आहे. राष्ट्राला धोका दिला आहे. आमचे संविधान, लोकशाही आणि एकता यांच्या संरक्षणासाठी त्यांच्यावर महाभियोग चालविला जावा.
तथापि, ट्रम्प यांनी पलटवार करताना बाइडेन यांना भ्रष्टाचारी संबोधले आहे.

बाइडेन यांचे काय आहे म्हणणे?
बाइडेन यांनी असा आरोप केला आहे की, ट्रम्प यांनी २५ जुलै रोजी फोनवर झालेल्या चर्चेत युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांच्यावर त्या भ्रष्ट व्यापारी व्यवहाराचा तपास करण्यासाठी दबाव वाढविला ज्यात बाइडेन कथित स्वरूपात सहभागी आहेत.

डेमोक्रॅ टिक सदस्य जो. बाइडेन यांचे म्हणणे आहे की, ट्रम्प यांनी युक्रेनची अमेरिकी सैन्य साहाय्यता रोखून तेथील राष्ट्रपती जेलेंस्की यांना तपास करण्यासाठी भाग पाडले.

Web Title: Demands impeachment against Trump; Accused of violating oath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.