शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण कोरियात मार्शल लॉची घोषणा, राष्ट्रपती यून सुक-योल म्हणाले, "देशविरोधी शक्तींचा अंत होईल"!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 22:10 IST

राष्ट्रपती यून सुक-योल आपल्या संबोधनात म्हणाले, 'उत्तर कोरियाच्या कम्युनिस्ट शक्तींकडून निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून दक्षिण कोरियाचे संरक्षण करण्यासाठी आणि देशविरोधी घटकांना संपवण्यासाठी मी आणीबाणी (इमरजन्सी) मार्शल लॉ जाहीर करत आहे.'

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक-योल यांनी मंगळवारी विरोधी पक्षांवर सरकार अपंग बनवणे, उत्तर कोरियाप्रति सहानुभूती ठेवणे आणि देशाची संवैधानिक व्यवस्था कमकुवत करण्याचा आरोप करत देशात 'इमरजन्सी मार्शल लॉ'ची घोषणा केली आहे. त्यांनी टेलिव्हीजनवरून देशाला संबोधित करताना ही घोषणा केली. याच बरोबर दक्षिण कोरियातील तणाव आणखी वाढला आहे. 

राष्ट्रपती यून सुक-योल आपल्या संबोधनात म्हणाले, 'उत्तर कोरियाच्या कम्युनिस्ट शक्तींकडून निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून दक्षिण कोरियाचे संरक्षण करण्यासाठी आणि देशविरोधी घटकांना संपवण्यासाठी मी आणीबाणी (इमरजन्सी) मार्शल लॉ जाहीर करत आहे.' देशाच्या स्वतंत्र आणि घटनात्मक व्यवस्थेचे रक्षण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पावरून युन यांची पीपल्स पॉवर पार्टी आणि विरोधी डेमोक्रॅटिक पार्टी यांच्यात सुरू असलेल्या वादानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

मे 2022 मध्ये पदभार स्वीकारल्यापासून विरोधी पक्षाच्या-नियंत्रणाखाली असलेल्या नॅशनल असेंब्लीमध्ये विरोधाचा सामना करणाऱ्या यून यांनी, सुव्यवस्था पुरस्थापित करण्यासाठी आणि दक्षिण कोरियाच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, 'मी शक्य तेवढ्या लवकर देशविरोधी शक्तींचा खात्मा करीन आणि देशात सामान्य स्थिती पूर्ववत करीन.

राष्ट्रपती यून यांनी विरोधकांचा आरोप सत्य सिद्ध केला - गेल्या काही महिन्यांपूर्वी, डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाने आरोप केला होता की अध्यक्ष यून हे सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल, त्यांच्याविरुद्धची महाभियोगाची कारवाई टाळण्यासाठी मार्शल लॉ लागू करण्याचा कट रचत आहेत. मार्शल लॉ देशात हुकूमशाहीला जन्म देऊ शकतो, असे विरोधी पक्षनेते ली जे-म्युंग यांनी म्हटले होते. युन यांनी विरोधकांचे हे आरोप फेटाळून लावले होते. पंतप्रधान हान डुक-सू यांनीही दावे फेटाळून लावले होते आणि दक्षिण कोरियाचे लोक असे पाऊल स्वीकारणार नाहीत, असे म्हटले होते.

टॅग्स :South Koreaदक्षिण कोरिया