बीजिंग : भारत सरकारचा पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय हा धक्कादायक आणि धाडसी असला तरी भ्रष्टाचार संपविण्यासाठी तो पुरेसा नाही, अशी प्रतिक्रिया चीनच्या माध्यमांतून व्यक्त झाली.चीनचे सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने आज एक लेख प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे की, पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा धक्का देणारा आणि धाडसी निर्णय घेऊन आपण भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या समस्येशी खरोखरच लढू इच्छितो, असे मोदी यांनी दाखवून दिले आहे. सत्तेवर आल्यापासून मोदी यांनी भ्रष्टाचाराशी लढण्यास अनेक निर्णय घेतले. त्यातील अनेक निर्णय अगदीच निरुपद्रवी असल्याचे दिसून येते.
निर्णय धाडसी; पण पुरेसा नाही
By admin | Updated: November 15, 2016 01:44 IST