शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

अमेरिकेत मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या पहिल्या भारतीय वंशाच्या आरोपीला 23 फेब्रुवारीला देणार मृत्युदंड 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 10:11 PM

अमेरिकेमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेला पहिला भारतीय वंशाचा नागरिक असलेल्या व्यक्तीला 23 फेब्रुवारी रोजी मृत्युदंड देण्यात येणार आहे. एक महिला आणि तिच्या नातीची हत्या केल्याप्रकरणी या व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

वॉशिंग्टन - अमेरिकेमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेला पहिला भारतीय वंशाचा नागरिक असलेल्या व्यक्तीला 23 फेब्रुवारी रोजी मृत्युदंड देण्यात येणार आहे. एक महिला आणि तिच्या नातीची हत्या केल्याप्रकरणी या व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.रघुनंदन यांदामुरी असे मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकाचे नाव आहे. त्याने 61 वर्षीय भारतीय महिलेचे आणि तिच्या दहा महिन्यांच्या नातीचे अपहरण करून त्यांची हत्या केली होती. या प्रकरणी न्यायालयात खटला चालून 2014 साली त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता 23 फेब्रुवारीला विषारी इंजेक्शन देऊन त्याला मृत्युदंड देण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र पेनसिल्व्हेनियाच्या गव्हर्नरनी 2015 साली कायद्यातून मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय दिलेला असल्याने रघुनंदन याला सुनावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी रद्द होऊ शकते, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.टाइम्स हेराल्ड या स्थानिक वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार यांदमुरी याला मृत्युदंड देण्यासाठी 23 फेब्रुवारीची तारीख निश्चित करण्यात आलेली असली तरी गव्हर्नर टॉम वुल्फ यांनी मृत्युदंडाची शिक्षा रद्द केलेली असल्याने त्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेमध्ये बदल होऊ शकतो.  मूळचा आंध्र प्रदेशमधील असलेला यांदमुरी हा एच-1बी व्हिसा घेऊन अमेरिकेत आला  होता. त्याने इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर सायन्स या विषयात पदवी घेतलेली होती. मात्र खुनाच्या गुन्ह्यात अडकल्यानंतर त्याची रवानगी कारागृहात झाली होती. मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर त्याने या शिक्षेविरोधात दाद मागितली होती. मात्र त्याने केलेले अपील गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात फेटाळून लावण्यात आले होते.  

टॅग्स :Crimeगुन्हाUSअमेरिकाCourtन्यायालयIndiaभारतAmericaअमेरिका