५३ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

By Admin | Updated: March 19, 2016 01:40 IST2016-03-19T01:40:26+5:302016-03-19T01:40:26+5:30

अमेरिकेतील लॉस एंजल्स शहरात बांधकाम सुरू असलेल्या ५३ मजली इमारतीवरून पडून इलेक्ट्रिशियनचा मृत्यू झाला.

Death fell from the 53rd floor | ५३ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

५३ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

लॉस एंजल्स : अमेरिकेतील लॉस एंजल्स शहरात बांधकाम सुरू असलेल्या ५३ मजली इमारतीवरून पडून इलेक्ट्रिशियनचा मृत्यू झाला.
विलशायर ग्रॅण्ड सेंटर या इमारतीचे बांधकाम सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर ही इमारत अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात उंच इमारत ठरणार आहे. दुर्दैवी इलेक्ट्रिशियनचा या ठिकाणी कामाचा हा दुसराच दिवस होता.
हा कामगार एका कारच्या मागच्या बंपरवर पडला. या घटनेने कारचालक महिलेला मानसिक धक्का बसला. ती हवेत हात हलविण्यासह दोन्ही हातात डोके दाबू लागली होती. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Death fell from the 53rd floor