अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे. इराणने जर होर्मुझ स्ट्रेट खाडीतून तेल वाहतुकीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका कारवाई करेल, असे ट्रम्प म्हणाले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. "जर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून होणारी तेल वाहतूक रोखण्यासाठी काही केले, तर अमेरिका त्यांच्यावर आतापर्यंत झालेल्या हल्ल्यांच्या तुलनेत २० टक्के जास्त विध्वंसक हल्ला करेल."
इराण पुन्हा उभे राहणे अशक्य होईल
"इतकेच नाही, तर आम्ही इराणच्या त्या ठिकाणांना लक्ष्य करून ज्यांना सहजपणे उद्ध्वस्त केले जाऊ शकते. त्यामुळे इराणला पुन्हा देश म्हणून उभे राहणे जवळपास अशक्य होऊन जाईल", असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.
"इराणवर मृ्त्यू, आग आणि विध्वंसाचा वर्षाव होईल. पण, मी आशा करतो आणि प्रार्थना करतो की, असे होऊ नये", अशी धमकी ट्रम्प यांनी इराणला दिली आहे.
अमेरिकेची आता अफगाणिस्तानवर आगपाखड
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने अफगाणिस्तानवर गंभीर आरोप केला आहे. चुकीच्या पद्धतीने लोकांना बंदी बनवणारा देश म्हणून अफगाणिस्तानला घोषित केले आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेने याबद्दलचे वृत्त देताना म्हटले आहे की, 'संयुक्त राष्ट्र संघात अमेरिकेच्या उच्चायुक्तांनी अफगाणिस्तानवर आरोप केला की, ते 'ओलीस ठेवण्याच्या रणनीती'मध्ये सहभागी आहेत.
परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनीही एक्स मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले की, "तालिबान धोरणात्मक सवलती मिळवण्यासाठी अजूनही दहशतवादी मार्गांचा वापर करत आहे, पण हे आमच्यासमोर फार काम करणार नाही."
"डेनिस कोयल, महमूद हबीबी यांच्यासह अफगाणिस्तान बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने बंदी बनवलेल्या अमरिकन नागिकांना तालिबानने तातडीने मुक्त करायला हवे", असेही रुबियो यांनी म्हटले आहे.
Web Summary : Donald Trump threatened Iran with unprecedented destruction if it hinders oil flow through the Strait of Hormuz. He warned of obliterating key sites, making Iran's recovery nearly impossible. The US also accused Afghanistan of wrongful detentions, demanding the release of American citizens.
Web Summary : डोनाल्ड ट्रम्प ने ईरान को होर्मुज जलडमरूमध्य से तेल प्रवाह बाधित करने पर अभूतपूर्व विनाश की धमकी दी। उन्होंने प्रमुख स्थलों को नष्ट करने की चेतावनी दी, जिससे ईरान का ठीक होना असंभव हो जाएगा। अमेरिका ने अफगानिस्तान पर गलत तरीके से हिरासत में लेने का भी आरोप लगाया और अमेरिकी नागरिकों की रिहाई की मांग की।