शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

पंधरा वर्षीय मॉडेलचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 18:29 IST

चीन - जर तुम्हीही क्षमतेपेक्षा अधिक काम करत असाल तर सावधान. कारण अतिरिक्त ताणात काम केल्यामुळे एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. एका १४ वर्षीय रशियन मॉडेलचा अतिकाम केल्याने ह्रुदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. व्यादा डि’झ्युबा असे या तरुण मॉडेलचं नाव आहे. ती चीनमध्ये इएसइइ या मॉडेलिंग एजन्सीमध्ये ...

ठळक मुद्देजर तुम्हीही क्षमतेपेक्षा अधिक काम करत असाल तर सावधान कारण अतिरिक्त ताणामुळे एका तरुणीला आपला जीव गमवावा लागलाय. तिचा मृत्यू बालमजुरीच्या मृत्यूपैकीच एक मानला पाहिजे, असंही काहींनी म्हटलं आहे. सोशल मीडियावर तिच्या ह्रदयविकाराने झालेल्या मृत्यूवर अनेकांनी हळहळही व्यक्त केली आहे. 

चीन - जर तुम्हीही क्षमतेपेक्षा अधिक काम करत असाल तर सावधान. कारण अतिरिक्त ताणात काम केल्यामुळे एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. एका १४ वर्षीय रशियन मॉडेलचा अतिकाम केल्याने ह्रुदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

व्यादा डि’झ्युबा असे या तरुण मॉडेलचं नाव आहे. ती चीनमध्ये इएसइइ या मॉडेलिंग एजन्सीमध्ये काम करत होती. तिच्या मृत्यूनंतर तिच्या आईने या मॉडेलचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिचा मोठा भाऊ आणि बहिणीच्या लहान मुलासोबत ती दिसते. सोशल मीडियावरील या फोटोवर अनेकांनी हळहळही व्यक्त केली आहे.  ती दिवसाला ६.३० युएस डॉलर एवढे दिवसाला कमवित होती. यासाठी ती दिवसातून तब्बल १३ तास काम करायची. दिवसातून १३ तास काम केल्याने तिच्यावर ताण आला आणि त्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पालकांकडून केला जात आहे.

एका असायन्मेंटकरता ती आपल्या आईशिवाय चीनमध्ये राहत होती. तिचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा ती फार थकलेली होती आणि त्यामुळे तिचा मेंदूही कार्यन्वित नव्हता असा अहवाल स्थानिक माध्यमांतून देण्यात आलाय. पुढच्या दोनच आठवड्यात तिचा पंधरावा वाढदिवस साजरा करण्यात येणार होता. मात्र त्याआधीच तिने जगातून निरोप घेतला आहे.  रशियन इनव्हेस्टिगेशन टीमकडून तिच्या मृत्यूच्या कारणाबाबत अधिक तपास सुरू आहे. त्याचप्रमाणे याप्रकरणी वेगळाच प्रश्नच निर्माण केला आहे. लहान वयात एवढ्या आपल्या मुलीला पाठवण्यामागे पालकांचा काय उद्देश असेल? त्याचप्रमाणे एखादी कंपनी लहान मुलांना १३ तासांची ड्युटी लावूच कशी शकतात? त्यामुळे हा मृत्यू बालमजुरीच्या मृत्यूपैकीच एक मानला पाहिजे, असंही काहींनी म्हटलं आहे.  व्यादाची आई ओकसाना म्हणते की, तिला ह्रदयविकाराचा झटका येण्याआधी तिने मला फोन केला होता. ‘मी खूप थकले आहे, मला खूप झोपेची गरज आहे,’ असं तिनं सांगितलं. आणि त्यानंतर काहीच वेळात तिचा मृत्यू झाला.

इएसइइचे संस्थापक झेंग ई सांगतात की, ‘आम्ही कोणत्याही प्रकारे बालमजुरी करून घेत नाहीत. शिवाय तिनेही कधीच कामाचा अतिरिक्त ताण असल्याची तक्रार आमच्याकडे केली नव्हती. ती अतिशय सालस आणि हुशार मुलगी होती. तिच्यासोबत आम्ही दोन वर्ष काम केलंय. त्यामुळे ती गेल्याने कधीच भरून न निघारी पोकळी निर्माण झाली आहे.’  इएसइइचे जनसंपर्क अधिकारी मिशेल चेन यांनी सांगितलं की, ‘इतर देशांप्रमाणे चीनमध्ये बालकामगारांबाबत कोणताच नियम नाहीए. त्यामुळे आम्ही कंपनीत लहान मुलांना कामावर ठेवू शकतो.’

सौजन्य - www.mirror.co.uk

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयchinaचीनHealthआरोग्य