दाऊद इब्राहिम जिवंत, छोटा शकिलकडून खुलासा

By Admin | Updated: April 29, 2017 10:00 IST2017-04-29T10:00:32+5:302017-04-29T10:00:32+5:30

कुख्यात माफिया व तस्कर दाऊद इब्राहिमच्या मृत्यूच्या बातम्या अफवा असल्याची माहिती त्याचा हस्तक छोटा शकिलने दिली आहे

Dawood Ibrahim alive, revealed from small shawl | दाऊद इब्राहिम जिवंत, छोटा शकिलकडून खुलासा

दाऊद इब्राहिम जिवंत, छोटा शकिलकडून खुलासा

>ऑनलाइन लोकमत
कराची, दि. 29 -  कुख्यात माफिया व तस्कर दाऊद इब्राहिमच्या मृत्यूच्या बातम्या अफवा असल्याची माहिती त्याचा हस्तक छोटा शकिलने दिली आहे. छोटा शकिलने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं आहे की, "भाईच्या (दाऊद) म-त्यूच्या बातम्या चुकीच्या आहेत. माझ्या आवाजावरुन तुम्हाला असं काही झालं असेल असं वाटतं का. या सगळ्या अफवा असून भाईची तब्ब्येत एकदम ठणठणीत आहे.
 
याआधी दाऊद इब्राहिम याची प्रकृती अत्यंत नाजूक असून तो येथील रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळाली होती. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्याच्या प्रकृतीबद्दल एक ना अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. एका बातमीनुसार दाऊदला हृदयविकाराचा झटका आला तर दुसऱ्या बातमीनुसार त्याला ब्रेन ट्युमर झाला आहे.  
 
पाकिस्तानातील प्रसिद्ध डॉक्टरांनी त्याच्यावर २२ एप्रिल रोजी कराचीत शस्त्रक्रिया केली होती परंतू ती वाया गेली. त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले. त्याच्या गंभीर प्रकृतीची माहिती त्याच्या मुंबईतील कुटुंबियांना दिली गेली आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. डी कंपनीशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदला २० दिवसांपूर्वी अर्धांगवायुचा झटका आला व त्यात त्याच्या शरीराचा उजवा भाग बधीर झाला.
 

Web Title: Dawood Ibrahim alive, revealed from small shawl