शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
2
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
3
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
4
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
5
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
6
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
7
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
8
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
9
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
10
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
11
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
12
आजचा अग्रलेख: पुन्हा गोंधळात गोंधळ!
13
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
14
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
15
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
16
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
17
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
18
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
19
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
20
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
Daily Top 2Weekly Top 5

'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 18:19 IST

China on Kiren Rijiju Statement over Dalai Lama’s Heir: दलाई लामा यांना त्यांच्या इच्छेनुसार उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार; भारताची स्पष्टोक्ती

China on Kiren Rijiju Statement over Dalai Lama’s Heir: बौद्ध धर्मगुरू दलाई लामा वयाची नव्वदी पूर्ण करणार आहेत, त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल, याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. अवघ्या जगाचे याकडे लक्ष याकडे लागले आहे. त्यांच्या पश्चात तिबेटी बौद्ध परंपरा टिकवून ठेवणे आवश्यक असल्याने, उत्तराधिकारी हा अतिशय महत्त्वाचा असतो. यातच चीनचा तिबेटवर डोळा असल्याने, या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न चीनकडून केला जातोय. दरम्यान, या प्रकरणात भारताने केलेल्या वक्तव्यावर चीनची प्रतिक्रिया आली आहे.

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी चीनला ठामपणे सांगितले की, "दलाई लामा यांना त्यांच्या इच्छेनुसार उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार आहे. दलाई लामांच्या उत्तराधिकारीची निवड केवळ स्थापित परंपरा आणि दलाई लामांच्या इच्छेनुसारच केली जाईल. यामध्ये इतर कोणालाही अधिकार नाही. चीनने यात हस्तक्षेप करू नये." या वक्तव्यावर आता चीनने आक्षेप घेतला असून, तिबेटशी संबंधित मुद्द्यांवर भारताने सावध विधाने करावी, जेणेकरून द्विपक्षीय संबंधांच्या सुधारणेवर त्याचा परिणाम होणार नाही, असे चीनने म्हटले आहे. नाही.

'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?

रिजिजू यांच्या वक्तव्यावरील प्रश्नाला उत्तर देताना, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारताने १४ व्या दलाई लामांच्या चीनविरोधी फुटीरतावादी स्वरुपाबद्दल स्पष्ट असले पाहिजे. शिवाय, झिझांग (तिबेट) शी संबंधित मुद्द्यांवर त्याच्या वचनबद्धतेचा आदर करावा. चीन तिबेटला झिझांग म्हणतो. माओ पुढे म्हणाले की, भारताने आपल्या शब्दात आणि कृतीत सावधगिरी बाळगावी. झिझांगशी संबंधित मुद्द्यांवर चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणे थांबवावे आणि चीन-भारत संबंधांच्या सुधारणा आणि विकासावर परिणाम करणारे मुद्दे टाळावेत.

दलाई लामांच्या निवडीसाठी चिनी कायदे पाळले पाहिजेत - माओमाओ यांनी चीनच्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना म्हटले की, दलाई लामा आणि तिबेटी बौद्ध धर्माचे दुसरे सर्वोच्च धार्मिक नेते पंचेन लामा यांच्या उत्तराधिकारीसाठीची निवड सुवर्ण कलशातून काढलेल्या भाग्य पत्रानुसार आणि केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार कठोर धार्मिक विधी आणि ऐतिहासिक परंपरांनुसार असावी. सध्याचे १४ वे दलाई लामा या प्रक्रियेतून गेले होते आणि तत्कालीन केंद्र सरकारने त्यांना मान्यता दिली होती. दलाई लामा यांचा उत्तराधिकारी निवडताना ही तत्त्वे, धार्मिक विधी, ऐतिहासिक परंपरा, चिनी कायदे आणि नियमांचे पालन केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

 

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामाchinaचीनIndiaभारत