शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

जपानवर सायबर हल्ला, विमानांच्या उड्डाणांना उशीर, तिकीट विक्री बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 10:39 IST

जपानची दुसरी मोठी एअर लाईन कंपनी जपान एअर लाइन्सवर गुरुवारी सायबर हल्ला झाला आहे. या हल्ल्यामुळे कंपनीची इंटर्नल आणि एक्सटर्नल सिस्टीमवर परिणाम झाला आहे.

आज गुरुवारी पहाटे जपान एअर लाईनवर गुरुवारी सायबर हल्ला झाला आहे. हा सायबर हल्ला एअरलाइन्सच्या सर्व्हरवर झाला. यानंतर जपान एअरलाइन्सने तिकिटांची विक्री बंद केली आहे. सायबर हल्ल्यांमुळे काही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांना उशीर होऊ शकतो, असे जपान एअरलाइन्सने सांगितले.सिस्टममध्ये बिघाड झाल्याने राउटर तात्पुरते बंद केले आहे.

विमान क्रॅश झाले की घातपात? पायलटने संपर्क साधला, हवाई दल काय करत होते?, मोठी माहिती आली समोर

याशिवाय गुरुवारी सुटणाऱ्या विमानांच्या तिकिटांची विक्रीही बंद करण्यात आली आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ७.२४ वाजता हा सायबर हल्ला झाला. याचा परिणाम कंपनीच्या अंतर्गत आणि बाह्य दोन्ही प्रणालींवर झाला आहे.

'आम्ही या परिस्थितीचे गांभीर्य आहे. सिस्टीमला रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत, असं जपान एअर लाईन्सकडून सांगण्यात येत आहे. 

ANA होल्डिंग्ज या जपानी विमान कंपनीने सांगितले की, सिस्टमवर सायबर हल्ल्याची कोणतीही चिन्हे नाहीत आणि आमच्या सेवा सुरळीतपणे कार्यरत आहेत. एएनए होल्डिंग्ज ही जपान एअरलाइन्सची प्रतिस्पर्धी मानली जाते.

ख्रिसमसच्या आधी, अमेरिकन एअरलाइन्सच्या नेटवर्क हार्डवेअरमध्ये तांत्रिक समस्येमुळे एका तासासाठी सर्व उड्डाणे ग्राउंड करण्यात आली. याचा फटका हजारो प्रवाशांना बसला.

या आधीही सायबर हल्ले झाले होते

विमान कंपन्यांवर सायबर हल्ल्याची ही पहिलीच घटना आहे, असे नाही. यापूर्वी २०२२ मध्ये रॅन्समवेअर ऑपरेटर ग्रुप डिक्सिन टीमने एअर एशियाच्या ५० लाख प्रवाशांचा डेटा चोरल्याचा दावा केला होता. एअर एशिया ही मलेशियाची प्रसिद्ध विमान कंपनी आहे. २०२३ मध्ये स्वीडिश विमान कंपनी स्कॅन्डिनेव्हियन एअरलाइन्सच्या वेबसाइटवरही सायबर हल्ला झाला होता.

रशियात विमान झाले क्रॅश

कझाकस्तानमधील अकताऊ विमानतळावर काल एका प्रवासी विमान कोसळले. या विमानामध्ये ६७ प्रवासी प्रवास करत होते. या अपघातामध्ये ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.  अजरबॅजान एअरलाइन्सच्या पॅसेंजर विमान बाकू येथील रशियाच्या चेचन्या येथील ग्रोन्जी विमानतळावर जात होते, त्याचवेळी पक्षाने धडक दिली. पक्ष्याच्या धडकेमुळे विमानाची ऑक्सिजन टाकी फुटल्याचा दावा करण्यात आला होता. या विमानात ६७ जण होते. यापैकी ३७ अझरबैजानचे तर १६ रशियाचे नागरिक होते. हा विमान अपघात कोणता घातपात असू शकतो असा दावाही करण्यात येत आहे. 

टॅग्स :Japanजपानairplaneविमान