कटलरी शेमिंग : तुम्ही काटे-चमचे वापरून जेवता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 07:26 IST2025-07-17T07:26:43+5:302025-07-17T07:26:52+5:30

युगांडा आणि भारत या दोन देशांशी नाते सांगणारे, अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठीच्या  प्रायमरीत आघाडीवर असलेले झोहरान ममदानी यांच्या निमित्ताने नुकताच हा शब्द चर्चेत आला.

Cutlery Shaming: Do you eat with a fork and spoon? | कटलरी शेमिंग : तुम्ही काटे-चमचे वापरून जेवता?

कटलरी शेमिंग : तुम्ही काटे-चमचे वापरून जेवता?

पाश्चात्त्य जगात काटे, चमचे आणि सुरी या साधनांचा (कटलरी) सफाईदारपणे वापर करून खाणे हे प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यामुळेच ज्यांना या गोष्टींचा सराईत वापर करता येत नाही किंवा ज्या जगात थेट हातांचा वापर करून जेवणेच रूढ आहे त्यांना हिणवले जाते, कमी लेखले जाते, अशा लोकांना असंस्कृत आणि सामाजिक उतरंडीत खालच्या दर्जाचेही समजले जाते. या विशेषत्वाने सांस्कृतिक भेदभावालाच ‘कटलरी शेमिंग’ अशी संज्ञा वापरली जाते. 

युगांडा आणि भारत या दोन देशांशी नाते सांगणारे, अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठीच्या  प्रायमरीत आघाडीवर असलेले झोहरान ममदानी यांच्या निमित्ताने नुकताच हा शब्द चर्चेत आला.  स्थलांतरित ममदानी यांनाही नुकतेच अशा ‘कटलरी शेमिंग’ला सामोरे जावे लागले. जेवणाच्या टेबलावर किंवा एखाद्या सामुदायिक सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आल्यानंतर काटे, चमचे, सुरी, ताट-वाटी अशा गोष्टींचा म्हणजेच ‘कटलरी’चा वापर कसा करावा, याचे काही शिष्टाचार पाश्चात्त्य जगात रूढ आहेत. तुम्ही कटलरीचा वापर करताना एक विशिष्ट क्रम पाळत नसाल तर त्यावरून तुम्हाला कमी लेखले जाणे, नकारात्मक शेरेबाजी  हे सगळे ‘कटलरी शेमिंग’ प्रकारात मोडते. 

कोणत्या पदार्थांसाठी कोणत्या प्रकारची भांडी वापरायची, ते पदार्थ कोणत्या क्रमाने, कोणत्या प्रकारचे चमचे वापरुन खायचे, काटा कुठल्या हातात आणि चमचा कुठल्या हातात धरायचा, काटा चमचा प्लेटवर कसा ठेवायचा, याबाबतही नियम आहेत. हे ‘टेबल मॅनर्स’ पाळले जात नसतील तर ‘कटलरी शेमिंग’चा सामना करावा लागतो. टेबल मॅनर्स, कटलरीचा वापर करण्याचे ‘एटिकेट्स’ हे तुमच्या संस्कृतीचा भाग नसतील तर त्यावरून तुमची अवहेलना करण्याचा प्रकारही पाश्चात्त्य जगात सर्रास चालतो. सध्या सोशल मीडियाचाही वापर ‘कटलरी शेमिंग’साठी केला जाताना दिसतो.

Web Title: Cutlery Shaming: Do you eat with a fork and spoon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.