सत्तेसाठी सौदी किंगचा खून करणार होता क्राउन प्रिन्स सलमान? माजी अधिकाऱ्याचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 01:19 PM2021-10-25T13:19:05+5:302021-10-25T13:20:22+5:30

असं असलं तरी माजी अधिकारी साद अल-जाबरी यांनी सीबीएस न्यूज द्वारे रविवारी प्रसारित कार्यक्रमात ६० मिनिटांच्या मुलाखतीत आपल्या दाव्याबाबत एकही पुरावा दिला नाही.

Crown prince Mohammed Bin Salman wanted to kill Saudi king Shah Abdullah claims former officer | सत्तेसाठी सौदी किंगचा खून करणार होता क्राउन प्रिन्स सलमान? माजी अधिकाऱ्याचा खुलासा

सत्तेसाठी सौदी किंगचा खून करणार होता क्राउन प्रिन्स सलमान? माजी अधिकाऱ्याचा खुलासा

Next

अमेरिका आणि सौदी अरबच्या (Saudi Arab) दहशतवादी विरोधी संयुक्त प्रयत्नात मदत करणारे एक माजी वरिष्ठ सौदी सुरक्षा अधिकाऱ्याने सौदी अरबचा क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमानवर मोठा गंभीर आरोप लावला आहे. गुप्तचर विभागाचे माजी अधिकारी साद अल-जाबरी यांचा आरोप आहे की, सत्ता मिळवण्यासाठी क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (Crown Prince Mohammed bin Salman)ने त्याचे वडील शाह बनण्याआधी तत्कालीन शाह अब्दुल्ला (Shah Abdullah) यांची हत्या करण्याबाबत विचार केला होता.

असं असलं तरी माजी अधिकारी साद अल-जाबरी यांनी सीबीएस न्यूज द्वारे रविवारी प्रसारित कार्यक्रमात ६० मिनिटांच्या मुलाखतीत आपल्या दाव्याबाबत एकही पुरावा दिला नाही. जाबरी सध्या कॅनडामध्ये जीवन जगत आहेत. त्यांनी आरोप लावला की, २०१४ मध्ये प्रिन्स मोहम्मद बिन सलमान म्हणाला होता की, तो शाह अब्दुल्लाची हत्या करू शकतो. त्यावेळी प्रिन्स मोहम्मद सरकारमद्ये कोणत्याही मोठ्या पदावर नव्हता. शाह अब्दुल्लाच्या निधनानंतर त्याचं स्थान जानेवारी २०१५ मध्ये शाह सलमानने घेतलं.

अल-जाबरीने मुलाखतीच्या माध्यमातून प्रिन्स मोहम्मद बिन सलमानला इशारा दिला की, त्याच्याकडे एक व्हिडीओ आहे. ज्यातून शाही घराण्याचे अनेक रहस्य आणि अमेरिकेसंबंधी गोपनीय बाबींचा खुलासा होऊ शकतो. ६२ वर्षीय अल जाबरी म्हणाले की, 'क्राउन प्रिन्स तोपर्यंत गप्प बसणार नाही, जोपर्यंत तो मला मरताना बघत नाही. कारण तो माझ्याकडे असलेल्या माहितीमुळे घाबरलेला आहे'. अल-जाबरीने प्रिन्स मोहम्मद बिन सलमानला मनोरूग्ण आणि खूनी म्हटलं आहे.

तेच सौदी सरकारने सीबीएस न्यूजला सांगितलं की, अल-जाबरी एक बदनाम माजी अधिकारी आहे. जो आपले आर्थिक गुन्हे लपवण्यासाठी काहीही कहाण्या सांगतो. तसेच लक्ष भरकटवण्यासाठी तो हेच करतो हे आधीपासून माहीत आहे.

सरकारने अल-जाबरीच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे आमि इंटरपोल नोटीस जारी केली आहे. ज्यात आरोप लावला आहे की, त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. तर अल-जाबरीचा दावा आहे की, त्याने ही संपत्ती शाहोंच्या सेवेदरम्यान मिळवली.
 

Web Title: Crown prince Mohammed Bin Salman wanted to kill Saudi king Shah Abdullah claims former officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.