मोदींच्या कारभारावर अमेरिकी माध्यमांची टीका

By Admin | Updated: May 27, 2015 00:01 IST2015-05-27T00:01:10+5:302015-05-27T00:01:10+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारच्या कारभारास एक वर्ष पूर्ण होत असताना अमेरिकी प्रसार माध्यमांनी सरकारवर टीकात्मक लेख प्रसिद्ध केले.

The criticism of the American media on the functioning of Modi | मोदींच्या कारभारावर अमेरिकी माध्यमांची टीका

मोदींच्या कारभारावर अमेरिकी माध्यमांची टीका

न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारच्या कारभारास एक वर्ष पूर्ण होत असताना अमेरिकी प्रसार माध्यमांनी सरकारवर टीकात्मक लेख प्रसिद्ध केले.
मोदी सरकारला वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त वॉल स्ट्रीट जर्नलने एका लेखात म्हटले, की बदल व आर्थिक पुनरुज्जीवनासाठी मतदारांनी संपूर्ण बहुमताने मोदी यांना निवडून दिले. बहुमत पाठीशी असले तरीही वस्तुस्थिती तशीच आहे. उत्पादन क्षेत्रात विकास करण्याच्या इच्छेने मोदी यांनी मेक इन इंडिया मोहीम सुरू केली. जाहिरात करूनही मोदी यांची ही मोहीम फक्त चर्चेत राहिली आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या मते विरोधकांनी मोदी सरकारच्या दोन मोठ्या सुधारणा रोखल्या असून त्यांच्यावर गरीबविरोधी, शेतकरीविरोधी असल्याचा आरोप केला जात आहे.


 

Web Title: The criticism of the American media on the functioning of Modi