शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

जगभरातल्या गुन्हेगारी टोळ्या झाल्या सक्रीय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 12:21 PM

सारेच जण हवालदिल आणि गर्भगळीत झालेले असले तरी असेही अनेक जण आहेत, त्यांच्यासाठी कोरोनाची साथ इष्टापत्ती ठरली आहे. या साथीतून ते आपलं उखळं पांढरं करून घेताहेत. कोट्यवधी रुपये कमवताहेत.

ठळक मुद्देबनावट वेबसाइट्सद्वारे फसवणूक; शंभर देशांतील गुन्हेगारांना अटक

- लोकमत न्यूज नेटवर्ककोरोनाच्या संकटानं अख्खं जग भयभीत झालं आहे. हे संकट आता मानवजातीला कुठे घेऊन जाणार, जगभरातील किती लोकांना आयुष्यातून उठवणार, या संकटातून आपण जगणार की नाही, याचीही काहीच शाश्वती राहिलेली नाही. र्शीमंतांपासून ते कष्टकरी, मजुरांपर्यंत सर्वांच्याच डोक्यावर कोरोनानं मृत्यूच्या भयाची टांगती तलवार सज्ज ठेवली आहे. सारेच जण यामुळे हवालदिल आणि गर्भगळीत झालेले  असले तरी असेही अनेक जण आहेत, त्यांच्यासाठी कोरोनाची साथ इष्टापत्ती ठरली आहे. या साथीतून ते आपलं उखळं पांढरं करून घेताहेत. कोट्यवधी रुपये कमवताहेत. कोरोनाच्या काळात अनेकांचे उद्योगधंदे बंद पडले, कुठूनही पैसा येण्याचे मार्ग बंद झाले, पण या लोकांकडे मात्र पैशांच्या राशी जमा होताहेत. कोण आहेत हे लोक? आणि नेमका कसा होतोय त्यांना फायदा?सायबर गुन्हेगारांचं या काळात चांगलंच फावलं आहे. त्यांच्या अनेक संघटित टोळ्या निर्माण झाल्या आहेत आणि जगभरात त्यांनी धुमाकुळ घालायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या संकटातून कसाबसा आपला जीव वाचवण्याच्या चिंतेत असणार्‍या सर्वसामान्य लोकांच्या तोंडातला घासही काढून घेताना त्यांनी आशेवर असणार्‍या लोकांना आणखीच मरणाच्या खाईत ढकललं आहे. जगभरात वैद्यकीय सेवेचा आणि वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा असताना या भामट्यांनी नेमक्या याच वस्तूंचा ‘पुरवठा’ सुरू केला आहे. पण हजारो रुपये मोजूनही लोकांच्या हातात काय पडतंय, तर नकली, सबस्टॅँडर्ड वस्तू किंवा काहीही नाही!.अमेरिकेत कोरोनाचा कहर माजलेला असताना तिथे तर बनावट वेबसाइट्सचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे.कोणी आपल्या वेबसाइटवरून सर्जिकल मास्क विकतंय, कोणी हॅँड सॅनिटायर्जस, कोणी अँँटिव्हायरल औषधं, कोणी व्हॅक्सिन्स, कोणी कोरोना स्प्रे, तर कोणी कोविड-19 टेस्ट किट्स !.- अर्थातच बनावट!सगळीकडे या वस्तूंचा तुटवडा आहे, पण आपल्याला निदान इथे तरी या वस्तू मिळतील या आशेनं गरजू, हवालदिल झालेले लोक हजारो रुपये भरून आपल्या मालाची आगाऊ नोंदणी करताहेत, पण त्यांच्या हाती पडतेय ती केवळ निराशा.या बनावट वेबसाइट्सनी त्यासाठी आधार घेतलाय, तो वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित कंपन्यांचा, जे अशी उपकरणे तयार करतात.ैअमेरिकेच्या एका अधिकार्‍यानं सांगितलं, आम्ही अशा बनावट वेबसाइट्सच्या शोधात आहोत आणि रोज कितीतरी बनावट वेबसाइट्स आम्ही बंद करत आहोत. या सगळ्या वेबसाइट्सनी आपल्या नावापुढे  ‘कोरोना’ किंवा ‘कोविड-19’ अशा शब्दांचा वापर केला आहे. त्यात नामांकित कंपन्यांच्या नावांचा वापर केल्याने लोक त्यांच्या आमिषांना बळी पडत आहेत. अशा वेबसाइट्स किंवा त्या विकत असलेल्या उपकरणांना, औषधांना अन्न आणि औषध प्रशासनानंही कोणतीच मान्यता दिलेली नाही. जागतिक गुन्हेगारीवर नजर ठेवणार्‍या इंटरपोल या संस्थेनं तर यासंदर्भात अतिशय गंभीर इशारा दिला आहे. जवळपास शंभर देशातील शेकडो गुन्हेगारांना केवळ महिन्याभराच्या काळातच त्यांनी अटक केली आहे आणि कोट्यवधी डॉलरची रक्कमही त्यांच्याकडून जप्त केली आहे. जगभरातील या भामट्यांविरुद्ध ‘ऑपरेशन पॅँगिआ’ ही मोहीमही त्यांनी सुरू केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या