भ्याड! फ्रान्समध्ये लहान मुलांवर चाकू हल्ला; पार्कमध्ये खेळणारी सहा बालके गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 16:52 IST2023-06-08T15:29:35+5:302023-06-08T16:52:22+5:30
आल्प्समधील एका शहरात गुरुवारी हा हल्ला झाला. या हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे, असे फ्रान्सचे अंतर्गत व्यवहार मंत्र्यांनी सांगितले.

भ्याड! फ्रान्समध्ये लहान मुलांवर चाकू हल्ला; पार्कमध्ये खेळणारी सहा बालके गंभीर
फ्रान्समध्ये माथेफिरुने पार्कमध्ये घुसून लहान मुलांवर चाकूहल्ला केला आहे. यामध्ये प्राथमिक माहितीनुसार सहा बालके गंभीर जखमी झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
आल्प्समधील एका शहरात गुरुवारी हा हल्ला झाला. या हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे, असे फ्रान्सचे अंतर्गत व्यवहार मंत्र्यांनी सांगितले. अॅनेसी शहरातील एका चौकात हे पार्क आहे. तिथे खेळण्यासाठी आलेल्या मुलांवर हा हल्ला झाला आहे, असे गेराल्ड डारमॅनिन यांनी सांगितले.
Several children have been injured in a knife attack in Annecy, a town located in the French Alps and the aggressor had been arrested, said the French Interior minister: Reuters
— ANI (@ANI) June 8, 2023
स्थानिक आमदार अँटोनी आर्मंड यांनी देखील ट्विट करून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. खेळाच्या मैदानावर मुलांवर झालेला हा भ्याड आणि घृणास्पद असा हल्ला आहे, असे ते म्हणाले.