पार्कच्या बेंचवर दांपत्य करत होतं सेक्स, व्हिडीओ व्हायरल, होऊ शकते एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 15:18 IST2017-10-12T13:31:06+5:302017-10-12T15:18:43+5:30
इंटरनेटवर सध्या एका दांपत्याचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दांपत्य पार्कमधील बेंचवर सेक्स करताना दिसत आहे. दांपत्यावर सार्वजनिक नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप असून त्यांना दोन हजार अमेरिकन डॉलर्सचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

पार्कच्या बेंचवर दांपत्य करत होतं सेक्स, व्हिडीओ व्हायरल, होऊ शकते एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा
वॉशिंग्टन - इंटरनेटवर सध्या एका दांपत्याचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दांपत्य पार्कमधील बेंचवर सेक्स करताना दिसत आहे. दांपत्यावर सार्वजनिक नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप असून त्यांना दोन हजार अमेरिकन डॉलर्सचा दंड ठोठावला जाऊ शकतो. सोबतच एक वर्षाच्या कारावासाचीही शिक्षा होण्याची शक्यता आहे. मिररने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना अमेरिकेतील इलिनोए येथील आहे. हे दांपत्य नेमकं कोठून आलं होतं, किंवा कुठे राहतं याबाद्दल कोणतीच माहिती मिळालेली नाही.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत हे दांपत्य बिनधास्तपणे पार्कात सेक्स करत असल्याचं दिसत आहे. यावेळी तिथे उपस्थित एका व्यक्तीने हे कृत्य कॅमे-यात कैद करत व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करुन टाकला. विशेष म्हणजे, जेव्हा ती व्यक्ती दांपत्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होती, तेव्हा महिलेने त्याला पाहिलेलं आहे. यावेळी ती त्याच्याकडे पाहून हसत होती. यानंतर महिला व्हिडीओ रेकॉर्डिंग न करण्यासाठी व्यक्तीला सुनावते. मी माझ्या पतीसोबत आहे असं सांगतानाही ती दिसत आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाही अशा प्रकारची एक घटना समोर आली होती. त्यावेळी सेक्स करत असलेल्या दांपत्याने पोलिसांचा आदेश मानण्यास नकार दिला होता. हे दांपत्या कारच्या मागील सीटवर सेक्स करत होतं. आदेश मानण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केलं होतं.
डॉमिनोज पिझ्झा शॉपमध्ये सेक्स करणं दांपत्याला पडलं महागात
ब्रिटनमधील ब्रिडलिंग्टन येथे डॉमिनोज पिझ्झा शॉपमध्ये सेक्स करणं एका दांपत्याला चांगलंच महाग पडलं. जेव्हा हे दांपत्य सेक्स करत होतं, तेव्हा आजूबाजूला कोणीच उपस्थित नव्हतं. मात्र त्यांचं हे कृत्य तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झालं. न्यायालयाने दांपत्याला सार्वजनिक ठिकाणी अयोग्य वर्तन केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. 17 ऑक्टोबर रोजी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. डॅनिएला हर्स्ट आणि क्रेग स्मिथ यांचा व्हिडीओ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आला. जवळपास 30 मिनिटे चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने 29 वर्षीय डॅनिएला हर्स्ट आणि 31 वर्षीय क्रेग स्मिथ यांना दोषी ठरवलं. सुनावणीदरम्यान न्यायालयात 18 मिनिटांचा हा व्हिडीओही पाहण्यात आला.