Cory Booker: अरे बापरे! संसदेत केलं सलग २५ तास भाषण, कोण आहेत खासदार कोरी बुकर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 11:42 IST2025-04-02T11:39:40+5:302025-04-02T11:42:24+5:30

Cory Booker News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यात घेतलेल्या निर्णयांची कोरी बुकर यांनी अक्षरशः चिरफाड केली. त्यांनी अमेरिकेच्या संसदेत सलग २५ तास मॅरेथॉन भाषण केले. त्यांच्या भाषणाची सगळीकडे चर्चा होत आहे. 

Cory Booker: Oh my god! He spoke in Parliament for 25 hours straight, who is MP Cory Booker? | Cory Booker: अरे बापरे! संसदेत केलं सलग २५ तास भाषण, कोण आहेत खासदार कोरी बुकर?

Cory Booker: अरे बापरे! संसदेत केलं सलग २५ तास भाषण, कोण आहेत खासदार कोरी बुकर?

Cory Booker Speech Length: अमेरिकेच्या संसदीय इतिहासात मंगळवारी (१ एप्रिल) इतिहास घडला. डेमोक्रॅटिक पक्षाचे न्यूजर्सीचे खासदार कोरी बुकर यांनी तब्बल २५ तास मॅरेथॉन भाषण केले. त्यांच्या सलग २५ भाषणामुळे १९५७ मधील ऐतिहासिक रेकॉर्ड मोडला गेला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

कोरी बुकर यांनी मंगळवारी संसदेत २५ तास आणि ५ मिनिटांचं मॅरेथॉन भाषण केले. २५ तासांच्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशांची आणि त्यांच्या धोरणांची चिरफाड केली.

१९५७ मधील भाषणाचा रेकॉर्ड मोडला

कोरी बुकर यांनी स्टॉर्म थर्मंड यांच्या भाषणाचा विक्रम मोडला. १९५७ मध्ये स्टॉर्म थर्मंड यांनी अमेरिकेच्या संसदेत २४ तास १८ मिनिटांचं मॅरेथॉन भाषण केले होते. 

वाचा >>आजपासून जगावर लागणार डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘जशास तसा’ कर

खासदार कोरी बुकर यांनी सोमवारी सायंकाळी ६.५९ वाजता भाषण सुरू केले. हे भाषण मंगळवारी रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी संपले. इतके प्रदीर्घ भाषण करत त्यांनी सात दशकांपूर्वी झालेल्या भाषणाचा विक्रम मोडला. 

कोरी बुकर ट्रम्प यांच्या धोरणांवर काय बोलले?

बुकर म्हणाले, आज रात्री मी इथे उभा आहे कारण मी प्रामाणिकपणे हे मान्य करतो की, आपला देश संकटात आहे. अवघ्या ७१ दिवसांमध्येच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी देशाची सुरक्षा, आर्थिक स्थैर्य आणि आपल्या लोकशाहीच्या मूळावरच घाव घातला आहे. बुकर यांनी आपल्या २५ तासांच्या भाषणात डोनाल्ड यांनी गेल्या काही दिवसांत घेतलेल्या निर्णयांवर सडकून टीका केली. 

ट्रम्प यांचे परराष्ट्र धोरण, वैद्यकीय मदत, एलन मस्क यांच्या माध्यमातून होत असलेले सरकारी काम, वर्णभेद, मतदानाचा अधिकार आणि आर्थिक विषमता या मुद्द्यांवरही बुकर बोलले. 

कोरी बुकर यांनी कशी केली तयारी?

बुकर यांनी स्थानिक वृत्तसंस्थेला सांगितले की, माझा विचार न जेवण करण्याचा होता. मी शुक्रवारी अन्न पदार्थ खाणं बंद केलं आणि सोमवारी भाषण सुरू करण्याच्या एक रात्री आधी पानी प्यायचं थांबवलं", असे ते म्हणाले. 

कोण आहेत कोरी बुकर?

कोरी बुकर यांचा जन्म अमेरिकेतली वॉशिंग्टनमध्ये झाला होता. पण, त्याचे बालपण आणि तरुणपण न्यूजर्सीमध्ये गेले. ते ५५ वर्षीय कृष्णवर्णीय खासदार आहेत. 

कोरी बुकर यांनी येल लॉ स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्याचबरोबर त्यांनी स्टॅण्डफोर्ड विद्यापीठातूनही शिक्षण घेतले. बुकर यांनी वकिलीचे शिक्षण घेत असतानाच्या काळात एनजीओचे वकील म्हणूनही काम केले. 

कोरी बुकर हे अमेरिकेतील सर्वात मोठे शहर न्यूयॉर्कचे महापौरही राहिले आहेत. २०१३ पर्यंत ते कार्यरत होते. या काळात त्यांनी न्यूयॉर्कसाठी अनेक कामे केली. 

Web Title: Cory Booker: Oh my god! He spoke in Parliament for 25 hours straight, who is MP Cory Booker?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.