Corruptions Perceptions Index: भारतात भ्रष्टाचार किती? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलनं जारी केला डेटा, पाकिस्तानचीही स्थिती पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 11:34 PM2022-01-25T23:34:01+5:302022-01-25T23:34:30+5:30

India Corruption Perceptions Index 2021 : जगभरातील १८० देशांत होणाऱ्या भ्रष्टाचारावर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेनं जारी केला डेटा.

corruption perceptions index 2021 in pakistan ranking 140 out of 180 countries know about india new zealand other contries | Corruptions Perceptions Index: भारतात भ्रष्टाचार किती? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलनं जारी केला डेटा, पाकिस्तानचीही स्थिती पाहा

Corruptions Perceptions Index: भारतात भ्रष्टाचार किती? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलनं जारी केला डेटा, पाकिस्तानचीही स्थिती पाहा

googlenewsNext

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या करप्शन परसेप्शन इंडेक्स 2021  (Corruption Perceptions Index 2021) मध्ये पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षभरात पाकिस्तानमध्ये भ्रष्टाचारानं उच्चांकाची नवी पातळी गाठली असल्याचं यात सांगण्यात आलं आहे. १८० देशांच्या यादीमध्ये पाकिस्तान १६ स्थानांनी घसरून १४० व्या स्थानावर पोहोचला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचा 'नया पाकिस्तान'चा नारा हा निव्वळ राजकीय जुमला होता हे यावरून दिसून येते. या निर्देशांकात २०२० प्रमाणे २०२१ मध्येही भारत ८५ व्या क्रमांकावर आहे. करप्शन परसेप्शन इंडेक्स २०२१ मध्ये भारताचा स्कोअर ४० आहे, तर पाकिस्तानला फक्त २८ गुण देण्यात आले आहेत. निर्देशांकात डेन्मार्क ८८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.

२०२० मध्ये करप्शन परसेप्शन इंडेक्समध्ये पाकिस्तानला ३१ गुण देण्यात आले होते. त्यावेळी पाकिस्तान या यादीत १२४ व्या स्थानावर होता. इम्रान खान यांच्या कार्यकाळात पाकिस्तानमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. २०१८ मध्ये इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. त्यानंतर २०१९ मध्ये या यादीत पाकिस्तानचा क्रमांक १२० वा होता. २०२० मध्ये पाकिस्तान चार स्थानांनी घसरून १२४ व्या स्थानावर आला. २०२१ मध्ये पाकिस्तानने 16 स्थानांनी घसरून १४० व्या स्थानावर पोहोचला आहे. दरम्यान, नवाझ शरीफ, शाहिद खाकान अब्बासी यांच्या कार्यकाळात पाकिस्तान ११७ व्या स्थानावर कायम होता.

भारताची स्थिती कशी?
करप्शन परसेप्शन इंडेक्स २०२१ मध्ये, भारत गेल्या वर्षीप्रमाणेच ४० गुणांसह ८५ व्या क्रमांकावर आहे. २०१३ पासून या निर्देशांकात भारताची स्थिती लक्षणीयरीत्या सुधारली आहे. २०१४ आणि २०१५ मध्ये भारताचे गुण ३८ होता. हा गुण २०१६ भारताला ४० गुण देण्यात आले आणि २०१७ मध्ये ही स्थिती कायम होती. त्यानंतर २०१८ मध्ये भारताला ४१ गुण देण्यात आले होते. परंतु २०२० मध्ये भारताचा एक गुण कमी करण्यात आला.

अन्य देशांची काय स्थिती?
डेन्मार्क, न्यूझीलंड आणि फिनलंड प्रत्येकी ८८ गुणांसह अव्वल स्थानावर आहेत. नॉर्वे, सिंगापूर, स्वीडन, स्वित्झर्लंड, नेदरलँड, लक्झेंबर्ग आणि जर्मनी या देशांनी टॉप १० मध्ये स्थान मिळवले. ब्रिटन ७८ गुणांसह ११ व्या स्थानावर आहे. २०२० मध्ये अमेरिकेला ६७ गुण देण्यात आले होते. अमेरिकेला यावेळीही तितकेच गुण मिळाले. असं असलं तरी यादीत अमेरिकेची दोन स्थानांनी घसरण झाली आहे. कॅनडा ७४ गुणांसह १३ व्या स्थानावर आहे. दक्षिण सुदान ११ गुणांसह अखेरच्या स्थानी आहे, तर सोमालियाला १३, व्हेनेझुएलाला १४ आणि येमेन, उत्तर कोरिया आणि अफगाणिस्तानला प्रत्येकी १६ गुण देण्यात आलेत.

गेल्या वर्षी कमी प्रयत्न
ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने आपल्या अहवालात दावा केला आहे की, जगातील बहुतांश देशांनी गेल्या दशकात भ्रष्टाचाराची पातळी कमी करण्यात फारशी प्रगती केली नाही. या अहवालात असंही सांगण्यात आलं आहे की, कोरोनाच्या जागतिक महासाथीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. केवळ प्रणालीगत भ्रष्टाचार आणि कमकुवत संस्था असलेल्या देशांमध्येच नव्हे तर प्रस्थापित लोकशाहीमध्येही अधिकार आणि नियंत्रण तथा संतुलनाची प्रणाली तेजीनं कमकुवत होत असल्याचं यात नमूद करण्यात आलंय.

Web Title: corruption perceptions index 2021 in pakistan ranking 140 out of 180 countries know about india new zealand other contries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.