शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
3
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
4
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
5
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
6
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
7
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
8
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
9
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
10
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
11
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
12
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
13
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
14
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
15
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
16
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
17
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
18
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
19
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
20
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड

CoronaVirus: भारताला कोरोना संकटातून बाहेर काढण्यासाठी आता 'या' सर्वात जवळच्या मित्रानं दिला हात, पाठवणार मोठी मदत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 15:16 IST

ही संपूर्ण मदत विमानाच्या सहाय्याने भारतात पाठविली जात आहेत. ही विमानं मंगळवारपासून सुरू होतील आणि साधारणपणे संपूर्ण आठवडाभरच सुरू राहतील.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून भारताला बाहेर काढण्यासाठी जगभरातील देशांकडून भारताला मदत मिळत आहे. यातच आता ईस्रायलदेखील याच आठवड्यात भारताला लाइफ सेव्हिंग उपकरणे पाठवत आहे. भारतात पाठविल्या जात असलेल्या या उपकरणांत ऑक्सिजन जनरेटर्स आणि रेस्पेरेटर्रसचा समावेश आहे. ही सर्व उपकरणे विमानाच्या सहाय्याने भारतात पाठविली जात आहेत. ही विमानं मंगळवारपासून सुरू होतील आणि साधारणपणे संपूर्ण आठवडाभरच सुरू राहतील. (CoronaVirus  Israel is sending life saving equipment to get india out of the corona crisis)

संकट काळात इस्रायल भारतासोबत -इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गाबी अश्केनजी यांनी म्हटले  आहे, की भारत, इस्रायलचा सर्वात जवळचा आणि महत्वाचा मित्र आहे. दोन्ही देशांतील घट्ट मैत्रीचा हवाला देत परराष्ट्रमंत्री म्हणाले, भारत आणि इस्रायल यांच्यात अनेक प्रकारचे राजकीय, संरक्षण आणि आर्थिक स्वरुपाचे करार आहेत. या कठीण काळात आम्ही पूर्णपणे भारतासोबत उभे आहोत. आम्ही आमच्या भारतीय भाऊ आणि बहिणींसाठी लाइफ सेव्हिंग उपकरणे पाठवत आहोत. 

CoronaVirus: चिंताजनक! भारतात मे नंतर आणखी हाहाकार माजवणार कोरोना, वैज्ञानिकांचा दावा!

अश्केनजी यांनी, या कार्यात सहकार्य करणारे लोक इस्रायलमधील मुख्य आर्थिक संस्था, जसे इस्रायल-भारत चेम्बर ऑफ कॉमर्स, इस्रायल-एशिया चेम्बर ऑफ कॉमर्स, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इस्रायल, फेड्रेशन ऑफ इस्रायल चेम्बर्स ऑफ कॉमर्स यांच्या सहकार्यासाठीही आभार मानले आहेत.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात भारतानंही केली होती इस्रायलला मदत -इस्रायलमधील मुख्य संघटना JDC (American Jewish Joint Distribution Committee) देखील भारताला होत असलेल्या मदतीच्या प्रयत्नात सहभागी आहे आणि ऑक्सिजन जनरेटर्ससह इतर काही उपरकणे भारतात पाठवत आहे. इस्रायलने जारी केलेल्या एका निवेदनात, गेत वर्षी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात भारताने इस्रायलला केलेल्या मदतीचा उल्लेख करत म्हणण्यात आले आहे, की "आम्हाला आठवते, गेल्या वर्षी भारताने कोरोनो व्हायरस संकटाच्या सुरुवातीला, इस्रायलच्या मदतीसाठी कशा प्रकारे मास्क, हँड ग्लोव्हज औषधांसाठी कच्च्या मालासह अनेक गोष्ट्रींच्या एअर डिलिव्हरीला मंजुरी दिली होती आणि इस्रायली नागरिक सुरक्षित पोहोचण्यासाठीही मदत केली होती."

CoronaVirus : भारतात हाहाकार माजवतोय कोरोनाचा इंडियन व्हेरियंट; जाणून घ्या, किती आहे घातक?

रशियानंही पाठवलीय मदत - जगभरात भारताचा जिगरी मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियानेही भारताच्या मदतीसाठी नुकतीच दोन विमानं पाठविली आहेत. ही दोन्ही विमानं दिल्ली एअरपोर्टवर उतरली होती. रशियाने या दोन्ही विमानांत कोरोना रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणावर ऑक्सीजन, 75 व्हेंटिलेटर, 150 बेड साइड मॉनिटर आणि फॅबिपिराविर ऑषध पाठवले. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी ट्विट करत माहिती दिली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIsraelइस्रायलBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी