शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स पाठवणार, आपण मिळून जिंकू; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी हिंदीत लिहिला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 17:51 IST

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी हिंदीत संदेश लिहित मदत पाठवण्याचं दिलं आश्वासन. सध्या मोठ्या प्रमाणात देशात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या

ठळक मुद्देफ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी हिंदीत संदेश लिहित मदत पाठवण्याचं दिलं आश्वासन. सध्या मोठ्या प्रमाणात देशात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. देशात सातत्यानं दररोज ३ लाखांपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडताना दिसत आहे. भारताच्या या कठीण काळात काही देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. फ्रान्सनंदेखीलभारतीयांसाठी मदतीचा हात पुढे केला असून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच फ्रान्स कायमच भारतीयांसोबत असल्याचा संदेशही त्यांनी हिंदीतून लिहिला आहे. "आपण ज्या महासाथीच्या संकटातून जात आहोत त्यापासून कोणीही दूर राहिलेला नाही. भारत सध्या कठीण काळातून जात आहे हे आम्ही जाणतो. फ्रान्स आणि भारत कायमच एकत्र होते. आम्ही मदत पोहोचवण्यासाठी काम करत आहोत," असं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांनी म्हटलं आहे. त्यांनी यांसदर्भात हिंदीतून एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. "फ्रान्स भारताला वैद्यकीय उपकरणं ज्यामध्ये व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन आणि ८ ऑक्सिजन जनरेटर्स पाठवेल. प्रत्येक जनरेटर ऑक्सिजनचं उत्पादन करून एका रुग्णालयाला पुढील १० वर्षांसाठी आत्मनिर्भर करू शकेल," असंही ते म्हणाले. आमच्या मंत्रालयाचे विभाग वेगानं काम करत आहे. आमच्या कंपन्याही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहोत. एकजुट राहणं हे आमच्या राष्ट्राचं ध्येय आहे. दोन्ही देशांमध्ये मैत्रीला मोठं महत्त्व आहे आणि आपण एकत्र राहून ही लढाई नक्कीच जिंकू असा विश्वासही मॅक्राँ यांनी व्यक्त केला. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतFranceफ्रान्सNarendra Modiनरेंद्र मोदीFacebookफेसबुक