Coronavirus: डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती; आम्ही कोरोनावर लस शोधण्याच्या अगदी जवळ पोहचलो आहे पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 09:05 AM2020-04-24T09:05:10+5:302020-04-24T09:45:18+5:30

कोरोना विषाणूविरूद्ध लढाईतील अमेरिकेची आकडेवारी प्रगतीची चिन्हे दर्शवित आहे.

Coronavirus: We are very close to finding a vaccine on corona says Donald Trump pnm | Coronavirus: डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती; आम्ही कोरोनावर लस शोधण्याच्या अगदी जवळ पोहचलो आहे पण...

Coronavirus: डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती; आम्ही कोरोनावर लस शोधण्याच्या अगदी जवळ पोहचलो आहे पण...

googlenewsNext
ठळक मुद्देअमेरिकेत ४९ हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू जवळपास ८ लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागणआम्ही लस शोधण्याच्या जवळ पोहचलो आहे पण चाचणीला वेळ लागेल

वॉश्गिंटन – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगातील अन्य देशांवर संकट उभं राहिलं आहे. आतापर्यंत अमेरिकेसारख्या बलाढ्य देशात ४९ हजारांहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर ८ लाखाहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अद्याप कोरोना व्हायरसवर ठोस औषध न आल्याने लोकांना सुरक्षित ठेवणं सर्व देशांसमोर मोठं आव्हान आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना संबोधित करताना सांगितले की, जर्मनी, यूके आणि चीन या देशात कोरोनावर होणाऱ्या परिक्षणावर लक्ष ठेवल्यानंतर आम्ही एका लसीच्या खूप जवळ पोहचलो आहे. आमच्याकडे लसीवर काम करणारे चांगले आणि हुशार लोक आहेत. दुर्दैवाने आम्ही आत्ता परिक्षणाच्या अगदी जवळ नाही कारण जेव्हा चाचणी सुरू होते तेव्हा यास थोडा वेळ लागतो, परंतु आम्ही ते पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अमेरिकेचे संक्रमण रोग सल्लागार डॉ. अँथनी फौसी यांनी पूर्वी सांगितले की व्यापकपणे वापरासाठी लस मंजूर होण्यास १२ ते १८ महिने लागतील. बहुतेक आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की कोरोनावर लस तयार करण्यास किमान १२-१८ महिने लागू शकतात. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स म्हणाले की कोरोना विषाणूविरूद्ध लढाईतील अमेरिकेची आकडेवारी प्रगतीची चिन्हे दर्शवित आहे. न्यूयॉर्क मेट्रो क्षेत्र, न्यू जर्सी, कनेक्टिकट, डेट्रॉईट आणि न्यू ऑर्लीयन्स यासह प्रमुख व्हायरस हॉटस्पॉट्सवरील संकट कमी होताना दिसत आहे. आमचा एकमेव निष्कर्ष म्हणजे आम्हाला यश मिळत आहे असं ते म्हणाले.

तसेच जर आपण येत्या काही दिवसांत कोरोना विषाणू थांबवण्याचा प्रयत्न करत राहिलो तर आम्हाला खात्री आहे की उन्हाळ्याच्या सुरुवातीस एक राष्ट्र म्हणून आपण एका उंचीवर असू शकतो ज्यामध्ये कोरोना व्हायरस महामारी कितीतरी पटीने मागे असू शकते. १६ राज्ये औपचारिकपणे पुन्हा खुली करण्याबाबत उपाययोजना शोधल्या जात आहेत असं माइक पेन्स यांनी सांगितले.

आणखी वाचा...

मुलगा झाला म्हणून अख्ख्या पंचक्रोशीत बत्ताशे, लाडू वाटले; निघाला कोरोना पॉझिटिव्ह

विखारी पाकिस्तान! भारताविरोधात मोठ्या सायबर युद्धाला सुरुवात

नोकरी वाचेल पण... केंद्र सरकार कठोर उपाय योजणार; कर्मचाऱ्यांना फायदा की तोटा?

Web Title: Coronavirus: We are very close to finding a vaccine on corona says Donald Trump pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.