CoronaVirus: ‘ऑक्सफर्ड’ सप्टेंबरअखेरपर्यंत आणणार कोरोनाची लस?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 06:54 IST2020-04-19T04:45:00+5:302020-04-19T06:54:51+5:30
लस परिणामकारक असल्याचे प्रयोगांतून सिद्ध झाल्यास येत्या सप्टेंबरमध्ये तिचे १० लाख डोस तयार केले जाणार

CoronaVirus: ‘ऑक्सफर्ड’ सप्टेंबरअखेरपर्यंत आणणार कोरोनाची लस?
लंडन : कोरोना विषाणूच्या संसर्गावर प्रतिबंधक लस बनविण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये संशोधन सुरू आहे. या प्रयत्नांना यश आल्यास येत्या सप्टेंबरमध्ये ही लस कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.
या विद्यापीठाने हाती घेतलेल्या लस संशोधन प्रकल्पाच्या प्रमुख प्रा. सारा गिल्बर्ट यांनी सांगितले की, ऑक्सफर्ड विद्यापीठ बनवित असलेली प्रतिबंधक लस कोरोनाच्या निर्मूलनासाठी अतिशय परिणामकारक ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे. सीएचएडीओक्स१ असे या लसीला नाव दिले आहे. ही लस परिणामकारक आहे असे प्रयोगांतून सिद्ध झाल्यास येत्या सप्टेंबरमध्ये तिचे १० लाख डोस तयार करण्यात येतील. ऑक्सफर्ड विद्यापीठ बनवित असलेल्या सीएचएडीओक्स१ या लसीच्या विविध आजारांवर आतापर्यंत १२ क्लिनिकल ट्रायल घेतल्या आहेत. या लसीमुळे विषाणूंचा नाश होत असल्याचे दिसून आले आहे.
१२ क्लिनिकल ट्रायल पूर्ण
ऑक्सफर्ड विद्यापीठ बनवित असलेल्या सीएचएडीओक्स१ या लसीच्या विविध आजारांवर आतापर्यंत १२ क्लिनिकल ट्रायल घेण्यात आल्या आहेत.
त्यामुळे क्लिनिकल ट्रायल संपल्यानंतर सप्टेंबरमध्ये यश तर हाती लागेल पण तोवर रुग्णांवरील उपचारांसाठी लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन व्हावे असाही त्यांचा कटाक्ष आहे.