शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Coronavirus: ...म्हणून कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावर अजूनही लसीचा शोध लागला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 12:12 IST

कोरोना व्हायरससाठी सध्या अधिकृतपणे मंजूर असे औषध नाही.

चीनसह संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतातही अनेक राज्यांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.  सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या ३९६ वर पोहचली आहे तर आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. जगात ३ लाख ३० हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १४ हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाच्या आजारावर अजूनही अधिकृतपणे मंजूर असे औषधाचा शोध लागू शकला नाही.

कोरोना व्हायरस हा विषाणू पूर्णपणे नवीन आहे. तसेच लस तयार करणे ही एक दिर्घकाळ लागणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी खर्चदेखील भरपूर येतो. शिवाय, अशा लसी व्यापारी दृष्टीकोनातून फायदेशीर ठरत नाही त्यामुळे व्यावसायिक औषध कंपन्यांना अशी लस तयार करण्याच्या प्रेरणा कमी असतात आणि संशोधनालाही प्रोत्साहन कमी मिळते. तरीही सरकारच्या आग्रहानूसार काही कंपन्या त्यावर काम करत आहेत. 

केंब्रिज येथील मॉडर्नना थेरपीटिक्सने एवढ्यात चाचणीसाठी एक लस सादर केली आहे.  निरोगी लोकसंख्येस लस देण्यापूर्वी यातून हानी होण्याचा धोका कमी आहे आणि उपयोग जास्त आहे, अशी खात्री संशोधकांनी करुन घेतली. त्यानंतर त्या लसीची चाचणी आधी जनावरांमध्ये व नंतर लोकांमध्ये करावी लागते. यासाठी बऱ्याच महिन्यांचा कालावधी लागतो असं ओरोग्य तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसचा उपचार कसा केला जातो- 

कोरोना व्हायरससाठी सध्या अधिकृतपणे मंजूर असे औषध नाही. या विषाणूची लागण झालेल्या लोकांमध्ये असलेली लक्षणे दूर करण्यासाठी विश्रांती, द्रवरुप आहार आणि तापाचे नियंत्रण यासारखी सहायक काळजी घ्यावी. खोकला शामवणारी औषध, ताप नियंत्रित करणारे औषध, विश्रांती देणारे औैषध अशा रोगाच्या लक्षणांप्रमाणे आवश्यक वाटणारी नेहमीचे औषधे देण्यात येतात. गंभीर प्रकरणांत महत्वपूर्ण अवयवांचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी काळजी घेणारे उपचार करणे आवश्यक आहे.

उपचार काय आहे- 

हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि चिनी शास्त्रज्ञ यांच्यातील सामंजस्याने यावर काम करीत आहे. आतापर्यत तेथे ठोस काही झाले नाही. नॅशनल इनिस्टीट्यूट ऑफ हेल्थने कोरोनावर उपचार करु शकतो की नाही हे पाहण्याकरीता रेमडेसिव्हिर नावाच्या विषाणूविरोधी चाचणी सुरु केली आहे. परंतु या सर्व प्रयत्नांना काही महिने लागतात. कदाचित दीडे ते दोन वर्षही लागू शकतील. दरम्यानच्या काळात कोरोनाचे रुग्ण रुग्णालयात जातात तेव्हा त्यांना सहाय्यकारी काळजी घेणारा औषधोपचार केला जात आहे. जेणकरुन डॉक्टर रुग्णांना श्वोसोच्छास घेण्यास आणि त्यांच्या रोगप्रतिकारकशक्तींना विषाणू पराभूत होईपर्यत संक्रमणांपासून दूर राहण्यास मदत करतात. एड्सविरोधात केले जाणारे औषध- उपचार उपयोगी पडत असल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतchinaचीनdocterडॉक्टर