Coronavirus : कोरोनामुळे उदभवलेल्या आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 05:48 AM2020-03-19T05:48:55+5:302020-03-19T05:49:52+5:30

चीनमधील हुबेई प्रांत व वुहान शहरातून कोरोनाची साथ सर्वत्र पसरून त्यामुळे जगभरात ७९०० जणांचा बळी गेला तर आजवर सुमारे २ लाख लोकांना या विषाणूची लागण झाली आहे.

Coronavirus: US, UK ready to face financial crisis caused by Corona | Coronavirus : कोरोनामुळे उदभवलेल्या आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन सज्ज

Coronavirus : कोरोनामुळे उदभवलेल्या आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन सज्ज

Next

पॅरिस : कोरोना विषाणूच्या साथीमुळे जागतिक स्तरावर अब्जावधी डॉलरचे नुकसान झाले असून, त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करण्यासाठी अमेरिका व ब्रिटनने अनेक उपाय योजले आहेत. या साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्याने अन्य देशांतील प्रवाशांना युरोपीय समुदायाने प्रवेशबंदी केली आहे.
चीनमधील हुबेई प्रांत व वुहान शहरातून कोरोनाची साथ सर्वत्र पसरून त्यामुळे जगभरात ७९०० जणांचा बळी गेला तर आजवर सुमारे २ लाख लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. कोरोनाच्या साथीमुळे निर्माण झालेल्या संकटाचा हे दोन्ही देश योग्यरितीने मुकाबला करत नसल्याची टीका होत होती.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांना तत्काळ रोख स्वरुपात मदत देण्यासह अन्य तरतुदींचा समावेश असलेले व्यय विधेयक संमत करण्याबाबत माझे सरकार प्रयत्नशील आहे.
त्या देशातील कोरोनाग्रस्तांना ८५० अब्ज डॉलरची मदत करण्याचा विचार आहे. अमेरिकेतील सर्व ५० राज्यांमध्ये कोरोना साथीचा फैलाव झाला असून तिथे या साथीने बळी पडलेल्यांची संख्या १०५वर पोहोचली आहे.
ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी सांगितले की, कोरोनाच्या साथीमुळे अडचणीत आलेल्या ब्रिटनमधील उद्योगांना कर्जरुपाने ३३० अब्ज पौंडांची मदत देण्याचे तेथील सरकारने ठरविले आहे. तर फ्रान्सने ४५ अब्ज युरोची आर्थिक मदत देऊ केली आहे. अन्य देशांतील प्रवाशांना युरोपीय समुदायातील देशांमध्ये प्रवेशबंदी असून हा निर्बंध ३० दिवसांकरिता लागू असेल असे जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी सांगितले. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्याकरिता बेल्जियमपासून युरोपीय समुदायातील अनेक देशांत ५ एप्रिलपर्यंत काही निर्बंध घालण्यात आले आहेत. काही देशांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. (वृत्तसंस्था)

चीनमधील बळींची संख्या ३,२२६वर
चीनमधील वुहानमध्ये कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळून आला असून, आणखी १३ रुग्ण या साथीमुळे मरण पावले आहेत. त्यामुळे चीनमध्ये कोरोनामुळे बळी पडलेल्यांची संख्या आता ३,२२६वर पोहोचली आहे.
कोरोनाची साथ रोखण्यासाठी चीनने ३० हजार वैद्यकीय कर्मचारी तैनात केले आहेत. त्यामध्ये लष्करातील वैद्यकीय तज्ज्ञांचाही समावेश आहे.

Web Title: Coronavirus: US, UK ready to face financial crisis caused by Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.