शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

Coronavirus: ‘रेमडेसेविर’ औषधाचा संपूर्ण साठा अमेरिकेने स्वत:साठी राखून ठेवला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 12:51 AM

सप्टेंबरपर्यंतचे सर्व उत्पादन कंपनीकडून घेणार

वॉशिंग्टन : कोरोना विषाणूंमुळे होणाऱ्या आजारावर उपचार म्हणून वापरल्या जाणाºया रेमडेसेविर’ या अ‍ॅन्टीव्हायरल औषधाचा सप्टेंबरपर्यंत उत्पादित होणारा सर्व साठा फक्त आपल्या उपयोगासाठी राखून ठेवण्याचा करार अमेरिका सरकारने औषधाच्या उत्पादक कंपनीशी केला आहे. परिणामी, कंपनी पुढील तीन महिने कोणत्याही देशाला हे औषध पुरवू शकणार नाही.

‘गिलिएड सायन्सेस’ कंपनी ‘रेमडेसेविर’चे उत्पादन करते. कंपनीकडून औषधाचे सुमारे पाच लाख ‘ट्रीटमेंट कोर्सेस’ अमेरिका सरकार देशातील इस्पितळांना पुरविणार आहे. या औषधाचा एक ‘ट्रीटमेंट कोर्स’ ६.२४ व्हाएल्सचा असतो. प्रत्येक इस्पितळास किती औषध पुरवायचे, याचा कोटा ठरविला आहे. इस्पितळांकडून औषधाच्या प्रत्येक ‘ट्रीटमेंट कोर्स’साठी ३,२०० डॉलर या घाऊक दराने किंमत आकारली जाईल.

‘गिलिएड सायन्सेस’ कंपनीच्या उत्पादन कार्यक्रमानुसार जुलैमध्ये ९४,२००, आॅगस्टमध्ये एक लाख ७४ हजार ९०० व सप्टेंबरमध्ये दोन लाख ३२ हजार ८०० ‘ट्रीटमेंट कोर्स’ एवढ्या औषधाचे उत्पादन केले जाईल. त्यापैकी ९० टक्के उत्पादन अमेरिका घेईल. अमेरिका, युरोप व आशियातील ६० ठिकाणच्या १.०६३ कोरोना रुग्णांवर या औषधाच्या चाचण्या घेतल्या असता इतर औषधांच्या तुलनेत लवकर व चांगला गुण येतो, असे कंपनीचे म्हणणे आहे.भारतीय कंपन्यांनी केले करार

  • भारतातील सिप्ला लि, डॉ. रेड्डीज लॅबॉरेटरीज, इव्हा फार्मा व झायडस कॅडिल्ला हेल्थकेअर यांनी औषधाच्या उत्पादनासाठी ‘गिलिएड सायन्सेस’शी करार केले असल्याचे कळते. या कंपन्या औषधाची किंमत ठरवू शकतील. मात्र, सरकारी यंत्रणांकडून परवानग्या घेण्याची जबाबदारी त्यांची असेल.
  • ‘कोविड-१९’ला महामारी म्हणून जाहीर करणारा जागतिक आरोग्य संघटनेचा निर्णय लागू असेपर्यंत वा या आजारावर अन्य औषध किंवा लस उपलब्ध होईपर्यंत परवाना घेतलेल्या अमेरिकेबाहेरील कंपन्यांना ‘गिलिएड सायन्सेस’ला रॉयल्टी द्यावी लागणार नाही.
  • अमेरिकेतील सर्व उत्पादन अमेरिका घेणार असल्याने कंपनी अन्य देशांतते पुरवू शकणार नाही.
  • अन्य देशांना औषध मिळावे यासाठी कंपनीने भारत, इजिप्त व पाकिस्तानंमधील काही कंपन्यांना औषध बनविण्याचे तंत्रज्ञान व परवाना देण्याचे ठरविले आहे. अमेरिकेबाहेर हे औषध ‘जेनेरिक’ स्वरूपात विकले जाईल.

 

टॅग्स :Americaअमेरिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत