CoronaVirus Updates: नव्या कोरोना व्हेरिअंटवर लस कंपन्या काय म्हणाल्या? जग भितीच्या छायेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 16:50 IST2021-11-27T17:14:41+5:302021-11-29T16:50:22+5:30
New Corona Variant: नव्या कोरोना व्हेरिअंटने कोरोनाची लसच नाही तर बुस्टर डोसही फेल केले आहेत. WHO ने चिंता व्यक्त केल्यानंतर लस निर्माता कंपन्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

CoronaVirus Updates: नव्या कोरोना व्हेरिअंटवर लस कंपन्या काय म्हणाल्या? जग भितीच्या छायेत
कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने जगाला भीतीच्या छायेत ढकलले आहे. एका देशाने 14 दिवसांचा लॉकडाऊन लावला असून अन्य देशांनी निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. भारताने १२ देशांतून येणाऱ्या प्रवाशांना स्क्रीनिंग अनिवार्य केले आहे. डब्ल्यूएचओने नव्या व्हेरिअंटच्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. आता कोरोनावर लस बनविणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
अमेरिकेची औषध निर्माता कंपनी मॉडर्नाने म्हटले की कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटविरोधात बुस्टर डोस तयार करणार आहे. Omicron व्हेरिअंट हा म्युटेशनशी संबंधीत आहे. आणखी काही दिवस आम्ही या व्हेरिअंटवर लक्ष ठेवणार आहोत.
फायझर आणि बायोएनटेकने लोकांमधील भीती आणखी वाढविली आहे. शनिवारी या औषध कंपन्यांनी म्हटले की, आम्ही बनविलेली लस कोरोनाच्या या नव्या अवतारावर प्रभावी आहे की नाही हे आम्ही सांगू शकत नाही.
दुसरीकडे जगातील पहिली लस बनविण्याचा दावा करणाऱ्या रशियाच्या स्पुतनिक कंपनीने म्हटले की, 100 दिवसांच्या आत या नव्या कोरोना व्हेरिअंटविरोधात लस आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
बुस्टर डोसही फेल
कोरोनाचा b.1.1.529 व्हेरिअंट सापडल्याची घोषणा गुरुवारी दक्षिण आफ्रिकेच्या वैज्ञानिकांनी केली होती. आता हा व्हेरिअंट अन्य दोन देश इस्त्रायल आणि बेल्जिअममध्येही सापडला आहे. हाँगकाँगमध्येही एक रुग्ण सापडला आहे. डब्ल्यूएचओनुसार आतापर्यंत या व्हेरिअंटच्या जवळपास 100 जीनोम सिक्वेंन्सिंगची सूचना मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या व्हेरिअंटची लागण झालेल्या अनेकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळालेले होते. त्याहून धक्कादायक म्हणजे इस्त्रायलच्या ज्या व्यक्तीला नव्या व्हेरिअंटची लागण झाली आहे त्याला बुस्टर डोसही मिळाला होता.
काय आहे नाव ठेवण्याची पद्धत
या वर्षी 31 मे रोजी, WHO ने कोरोना व्हायरसच्या प्रकारांची नावे देण्याचा 'सोपा मार्ग' पुढे केला. ग्रीक अक्षरे अनुक्रमाने प्रत्येक प्रकाराला नियुक्त केली होती. कोविड प्रकारांना आतापर्यंत 'अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, एप्सिलॉन, झिटा, इटा, थिटा, ओटा, कप्पा, लॅम्बडा, मु' असे नाव देण्यात आले होते.
संबंधित बातम्या..