शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

coronavirus: चीन, रशिया कोरोनाची खोटी माहिती पसरवत नसल्याचा ट्विटरचा दावा, अमेरिकेने केला होता आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 02:16 IST

कोरोना साथीबद्दलच्या खोट्या माहितीच्या प्रचारासाठी चीन व रशिया ट्विटरचा शिताफीने वापर करीत आहेत. त्यासाठी ट्विटरवर अनेक खाती उघडण्यात आली आहेत, असाही दावा गॅब्रिएल यांनी केला होता.

वॉशिंग्टन : कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत चीनरशिया  ट्विटरवरून खोटी माहिती पसरवत असल्याचा अमेरिकेने केलेला आरोप ट्विटरने फेटाळून लावला आहे.अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या अख्यत्यारीतील ग्लोबल इन्गेजमेंट सेंटरच्या (जीईसी) प्रमुख लिए गॅब्रिएल यांनी शुकवारी चीनरशियावर आरोप केला होता. कोरोना साथीबद्दलच्या खोट्या माहितीच्या प्रचारासाठी चीन व रशिया  ट्विटरचा शिताफीने वापर करीत आहेत. त्यासाठी टिष्ट्वटरवर अनेक खाती उघडण्यात आली आहेत, असाही दावा गॅब्रिएल यांनी केला होता.या आरोपाच्या अनुषंगाने  ट्विटरने त्या खात्यांची बारकाईने तपासणी सुरू केली. मात्र, त्यातील अनेक खाती सरकारी अधिकारी, स्वयंसेवी संस्था, पत्रकारांची असल्याचे  ट्विटरला आढळून आले. तरीही संशयास्पद वाटणाºया खात्यांची तपासणी यापुढेही केली जाईल, असे टिष्ट्वटरने जाहीर केले आहे.अमेरिकी सरकारच्या जीईसी संस्थेने संशयास्पद वाटणा-या अडीच लाख खात्यांची यादी  ट्विटरला सुपूर्द केली होती. त्या खात्यांची बारकाईने तपासणी करून त्याबाबतची निरीक्षणे  ट्विटर कंपनीने जीईसीला कळविली आहेत.

अमेरिका, चीनमध्ये वादंगकोरोना साथीची खरी माहिती चीन दडवून ठेवत असल्याचा आरोप अमेरिका सातत्याने करीत आहे. चीनमधून उगम पावलेल्या कोरोनाच्या साथीने त्या देशापेक्षा अमेरिका, युरोपीय देशांमध्ये मोठा हाहाकार माजविला आहे. चीनच्या प्रयोगशाळेत कोरोना विषाणूची निर्मिती करण्यात आली याचे सज्जड पुरावे आमच्याकडे आहेत, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ वारंवार सांगत आहेत. त्यांचे हे आरोप बिनबुडाचे असल्याचा चीनचा दावा आहे. आता चीनबरोबरच रशियाच्या विरोधातही अमेरिकेने तोफ डागली आहे. चीन व अमेरिकेतील वादंगाने आता उग्र रूप धारण केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTwitterट्विटरchinaचीनrussiaरशियाUnited Statesअमेरिका