शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

Coronavirus: ६ पेक्षा जास्त जण एकत्र नकोत; तीन दिवसांत १०,००० रुग्ण वाढले, 'या' देशाने नियम बदलले!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 4:41 PM

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं नियमांत बदल; सहापेक्षा अधिक नागरिक एकत्र आल्यास भरभक्कम दंड आकारला जाणार

कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या तीन दिवसांत १० हजारांची वाढ झाल्यानं इंग्लंडनं आजपासून जास्त नागरिकांनी एकत्र येण्यावर निर्बंध आणले आहेत. सहापेक्षा अधिक जणांनी एकत्र येऊ नये, असा नियम सरकारनं केला आहे. त्यामुळे घरात किंवा घराबाहेर आयोजित समारंभात जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. इंग्लंड सरकारनं याबद्दलचे आदेश दिले आहेत.एकावेळी सहापेक्षा अधिक जणांना एकत्र येता येणार नाही, असा नियम असला तरी यातून काही गोष्टी वगळण्यात आल्या आहेत. शाळा, कार्यालयं, कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळजी घेऊन आयोजित केले जाणारे विवाह सोहळे, अंत्यविधी, क्रीडा सामने यांना निर्बंध लागू असणार नाहीत. सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन झाल्यास १०० पाऊंड्सचा दंड आकारला जाईल. नियमांचा पुन्हा भंग केल्यास दंडाची रक्कम दुप्पट होत जाईल.कोरोनाच्या उद्रेकात रशिया 'या' देशाला सर्वात आधी ५ कोटी लसीचे डोस पुरवणार इंग्लंडनं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या नियमावलीत आजपासून बदल केले आहेत. सध्याच्या घडीला कितीही सदस्य असलेली दोन कुटुंबं घरात किंवा वेगवेगळ्या घरांमधील कमाल सहा सदस्य घराबाहेर भेटू शकतात. ही संख्या ३० च्या पुढे गेल्याशिवाय पोलीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू शकत नाहीत. मात्र या नियमांत आता इंग्लंड सरकारनं बदल केला आहे.काळजी वाढली! २०२१ च्या अखेरपर्यंत आहे तशीच राहणार परिस्थिती; प्रसिद्ध कोरोना तज्ज्ञांचा दावाइंग्लंडमध्ये आतापर्यंत ३ लाख ६८ हजार कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१ हजार ६२८ जणांनी जीव गमावला आहे. एप्रिल, मेमध्ये कोरोनानं इंग्लंडमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला होता. यानंतर जून, जुलैमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा आटोक्यात आला. मात्र ऑगस्टपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे आता कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या