शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
5
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
6
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
7
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
8
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
9
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
10
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
11
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
12
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
13
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
14
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
15
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
16
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
17
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
18
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
19
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
20
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा

coronavirus : अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाचे थैमान, जगभरात मृतांचा आकडा 34 हजारावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 08:05 IST

कोरोना विषाणूची सुरुवात झालेल्या चीनमध्ये आता जनजीवन सुरळीत होत असताना अमेरिका आणि युरोपमध्ये मात्र कोरोनाचा फैलाव वेगाने सुरू आहे.

न्यूयॉर्क  - अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोना विषाणूने गंभीर रूप धारण केले आहे. एकीकडे कोरोना विषाणूची सुरुवात झालेल्या चीनमध्ये आता जनजीवन सुरळीत होत असताना अमेरिका आणि युरोपमध्ये मात्र कोरोनाचा फैलाव वेगाने सुरू आहे. जगभरातील कोरोनाबधितांची संख्या 7 लाखावर तर मृतांचा आकडा 34 हजारांवर पोहोचला आहे.

 अमेरिकेत काल एका दिवसात 18 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत अमेरिकेत 2475 जणांचा मृत्यू झाला आहे. काल एका दिवसात अमेरिकेत 255 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्ये कोरोनामुळे अधिक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. इटलीत मृतांचा आकडा 10 हजार 700 हुन अधिक झाला आहे. इटलीतील लोंबार्डी प्रांतात 6 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये काल एका दिवसात 821 जणांनी कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.  स्पेनमधील मृतांचा आकडा सहा हजारांच्या पलीकडे पोहोचला आहे.

इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड, स्वित्झर्लंड, बेल्जियम या यूरोपीय देशांमध्येही कोरोनाची धोकादायक पातळी ओलांडली आहे. तर इराणमध्ये कोरोनाग्रस्थांचा आकडा 38 हाजारांवर पोहोचला आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत कोरोनाचे दीड हजार रुग्ण आढळले आहेत.  

दरम्यान, अमेरिकेत कोरोनावर उपचार करण्यासाठी वेगवेगळे  प्रयोग केले जात आहेत. ह्यूस्टनच्या एका मोठ्या रुग्णालयात कोविड -१९ पासून बरे झालेल्या रुग्णाचे रक्त या आजाराने ग्रासलेल्या एका रुग्णाला चढविण्यात आले आहे. प्राणघातक कोरोना विषाणूंपासून बरा झाल्यानंतर दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ चांगल्या स्थितीत राहिलेल्या व्यक्तीने रक्ताचा प्लाझ्मा दान केला आहे.  हा प्लाझ्मा ह्युस्टन मेथोडिस्ट हॉस्पिटलमधील 'कॉन्व्लेसेन्ट सीरम थेरपी' साठी दिला आहे. उपचाराची ही पद्धत 'स्पॅनिश फ्लू' साथीच्या आजारावेळी वापरण्यात आली होती

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnited StatesअमेरिकाItalyइटलीInternationalआंतरराष्ट्रीय