शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

China Coronavirus : कोरोनामुळे जगभरात घबराट; चीनबाहेर एकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2020 3:33 PM

चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 259 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मनीला - चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 259 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 9692 हून अधिक जणांना या व्हायरसचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातले आहे. जगभरात कोरोनामुळे घबराट पसरली आहे. चीनमध्ये आतापर्यंत यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. मात्र आता चीनच्या बाहेरही एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 

फिलिपिन्समध्ये कोरोना व्हायरसमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, अन्य देशांतही कोरोनाची लागण झाल्याने जागतिक आणीबाणी जाहीर करीत आहोत. आरोग्यसुविधा नसलेल्या देशांमध्ये कोरोनामुळे हाहाकार माजू शकतो, हा चिंतेचा विषय आहे. जागतिक आणीबाणी जाहीर केल्याने कोरोनाग्रस्त देशांना आर्थिक मदत व साधनसामग्री मिळू शकते. मात्र, विषाणूचा फैलाव झालेल्या देशांत नागरिकांना पाठविण्यास व व्यापारावर नियंत्रणे येतील. चीनच्या काही शहरांत जाणारी विमानसेवा अनेक कंपन्यांनी स्थगित केली आहे. मॅकडोनाल्ड, स्टारबक्स यांनी चीनमधील दुकाने बंद ठेवली आहेत.

भारतात केरळमध्ये पहिला रुग्ण समोर आला आहे. वृत्त एजन्सी शिन्हुआनुसार 1,36, 987 अशा लोकांची ओळख पटली आहे, जे कोरोनाने पीडित लोकांच्या संपर्कात आले होते. ज्या प्रवाशांनी गेल्या दोन आठवड्यांत चीनचा प्रवास केला होता, अशा प्रवाशांच्या प्रवेशास अमेरिकेने अस्थायी बंदी आणली आहे. मानव सेवा विभागाचे सचिव एलेक्स अजार यांनी सांगितले की, अमेरिकी नागरिक आणि स्थायी निवासींच्या कुटुंबांचे निकटचे सदस्य यांच्याशिवाय चीनचा प्रवास करून आलेल्या नागरिकांना प्रवेशबंदी असेल.

वुहानमध्ये अडकलेल्या सहा भारतीयांना ताप असल्याने एअर इंडियाच्या पहिल्या विशेष उड्डाणात बसू दिले नाही. तेथील भारतीयांना आणण्यासाठी एअर इंडियाचे दुसरे विमान दिल्ली विमानतळावरून दाखल झाले आहे. तत्पूर्वी, एअर इंडियाच्या एका विमानातून चीनच्या वुहानमधून 324 भारतीयांना घेऊन एक विमान शनिवारी सकाळी दिल्लीत दाखल झाले. वुहानमधून आणलेल्या भारतीयांत 3 अल्पवयीन, 211 विद्यार्थी आणि 110 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पदवीधारकांसाठी 5 हजार, पदव्युत्तरांसाठी 7500 रुपये बेरोजगारी भत्ता; काँग्रेसची घोषणा

Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला; दोन जवानांसह 4 जण जखमी

'हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर!', आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

यापुढे सरकारी प्रशिक्षण मदरसे, बारमध्ये ठेवा; आशिष शेलार संतापले

Budget 2020: केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात नवीन काहीच नाही: प्रकाश आंबेडकर

 

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीनDeathमृत्यूdoctorडॉक्टर