कोरोनावर उपचार सुरू असतानाच बहरली लव्हस्टोरी, डिस्चार्ज मिळताच प्रेयसीला केले प्रपोज...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 15:42 IST2020-05-20T15:41:22+5:302020-05-20T15:42:22+5:30
अनेकदा रुग्ण बरे झाले की, पहिला कॉल हा आपल्या कुटुंबियांना करतात. त्यांना भेटतात. मात्र या व्यक्तीने कुटुंबाला नाही तर पहिला कॉल आपल्या प्रेयसीला केला.

कोरोनावर उपचार सुरू असतानाच बहरली लव्हस्टोरी, डिस्चार्ज मिळताच प्रेयसीला केले प्रपोज...
कोरोना संकटावर मात करत अनेकजण बरे होत सुखरूप घरी परतत असल्याची सुखद बातमी सर्वत्रच पाहायला मिळते. कोरोना प्रादुर्भावाने अनेकांना वेढले असताना सकारात्मक घटना इतरांनाही एक नवीन उत्साह आणि न घाबरता याचा सामना करण्याचे बळ देते. लंडनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे लाखोंच्या संख्येत रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जगु किंवा मरू ? अशा भीतीने प्रत्येकजण तिथे वावरत आहे. अशात मात्र एका कोरोनाबाधीत रुग्ण कोरोनावर मात करत सुखरूप घरी परतला आहे. मात्र याची एक खास गोष्ट सध्या सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे. आयसीयूमध्ये याला ठेवण्यात आले होते.अनेकदा रुग्ण बरे झाले की, पहिला कॉल हा आपल्या कुटुंबियांना करतात. त्यांना भेटतात. मात्र या व्यक्तीने कुटुंबाला नाही तर पहिला कॉल आपल्या प्रेयसीला केला. इतकचे नाही तर प्रेयसीला फोनवरच चक्क लग्नाचीच मागणी घातली. कोरोनाच्या संकटावर मात केल्यानंतर जणु दुसरा जन्मच झाल्याचा आनंद त्याला झाला आहे. प्रेयसीने देखील क्षणाचाही विलंब न करता लग्नाला होकार दिला.
चांगल्या गोष्टीसाठी उद्याची वाट कशाला पाहायची याच उद्देशाने त्याने मिळालेला वेळ सत्कर्मी लावला आहे. यावरून उद्याची चिंता करणे सोडा आणि आहे तो काळ मजेत घालवा हाच खरा सुखी जीवनाचा मंत्र यावरून मिळाला आहे. कोरोना काळात अशा बऱ्याच लव्ह स्टोरी पाहायला मिळतात. ज्या इतरांसाठीही जगण्याची नवी उमेद निर्माण करतायेत.