शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

Coronavirus : 'संकटकाळात आम्ही मित्रासोबतच'; इस्रायलनं भारताला पाठवली वैद्यकीय मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 13:55 IST

शेकडो ऑक्सिजन जनरेटर, श्वसन यंत्र आणि भारतासाठी वैद्यकीय उपकरणे भारताकडे रवाना

ठळक मुद्देशेकडो ऑक्सिजन जनरेटर, श्वसन यंत्र आणि भारतासाठी वैद्यकीय उपकरणे भारताकडे रवानाऑक्सिजन जनरेटर, श्वसनाला मदत करणारे रेस्पिरेटर, औषधं आणि वैद्यकीय सामुग्री पाठवण्यास सुरूवात

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्यानं आरोग्य व्यवस्थेवरही मोठा ताण येत आहे. अनेक देशांनी भारतालावैद्यकीय मदतीसाठी हात पुढे केला आहे. तर दुसरीकडे भारताचा मित्र समजल्या जाणाऱ्या इस्रायलनंही भारतासाठी वैद्यकीय मदत पोहोचवण्यास सुरूवात केली आहे. या आठवडाभरात विविध विमानांच्या सहाय्याने ही मदत भारतात येणार असून त्यासाठी इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद, आरोग्य मंत्रालय, आर्थिक मंत्रालय यांच्यासोबत तेल-अवीवमधील भारतीय दूतावास आणि नवी दिल्लीतील इस्रायली दूतावासाचंही मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत आहे.इस्रायलनं भारताला हजारो वैयक्तिक किंवा सामूहिक वापरासाठी असलेले ऑक्सिजन जनरेटर, श्वसनाला मदत करणारे रेस्पिरेटर, औषधं आणि वैद्यकीय सामुग्री पाठवण्यास सुरूवात केली आहे. "भारत हा आमच्या सगळ्यात जवळच्या आणि महत्त्वाच्या मित्रदेशांपैकी एक आहे. भारतातील संकटाच्या या प्रसंगी इस्रायल भारतासोबत असून आमच्या भारतीय बाधंवाचे प्राण वाचवणारी वैद्यकीय उपकरणे आणि अन्य प्रकारची मदत पाठवत आहे. भारत आणि इस्रायलमधील संबंध सामरिक भागीदारीच्या स्वरुपाचे असून त्यात राजकीय, सुरक्षा आणि आर्थिक विषयांचा समावेश आहे,” अशी प्रतिक्रिया इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गाबी अश्कनाझी यांनी दिली.  या संयुक्त मदत कार्यात इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाची आर्थिक संबंध शाखा, इस्रायल-भारत चेंबर ऑफ कॉमर्स, द इस्रायल-एशिया चेंबर ऑफ कॉमर्स, मॅन्युफॅक्चरर्स असोसेशियन ऑफ इस्रायल, द फेडरेशन ऑफ इंडो-इस्रायली चेंबर्स ऑफ कॉमर्स, द इस्रायल एक्सपोर्ट इन्स्टिट्यूट, द स्टार्ट अप नेशन सेंट्रल यांच्यासह भारतात काम करणाऱ्या कंपन्यांचाही समावेश आहे. अमडॉक्स या कंपनीने १५० ऑक्सिजन जनरेटर भारताला देण्याची घोषणा केली आहे. ज्युईश जॉइंट डिस्ट्रिब्युशन कमिटी ऑक्सिजन सिलेंडर देणार असून मुंबईचे केइएम हॉस्पिटल, पनवेलचे महात्मा गांधी हॉस्पिटल आणि अहमदाबादच्या सरदार पटेल हॉस्पिटलला वेंटिलेटर पुरवणार आहे. कोरोना संकटाच्या सुरुवातीला भारताने इस्रायलला मास्क, पीपीइ किट आणि औषधं बनवण्यासाठी कच्चा माल पुरवला होता, तसेच भारतात रहाणाऱ्या इस्रायली नागरिकांना परत पाठवण्यातही मदत केली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतIsraelइस्रायलMedicalवैद्यकीयmedicineऔषधं