इस्लामाबादः कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलेलं असून, पाकिस्तानातही परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. कर्जबाजारी झालेल्या पाकिस्तानची कोरोना व्हायरसच्या संकटाशी दोन हात करताना अक्षरशः नाकीनऊ येत आहे. लॉकडाऊनमुळे देशभरात सर्व व्यवसाय बंद पडल्यामुळे आता पाकिस्तानात उपासमारीची समस्या निर्माण झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देश आणि जगाला संबोधून रविवारी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी जगाच्या देशांना पाकिस्तानला उपासमारीपासून वाचवण्याचे आवाहन केले आहे. इम्रान खान यांचे हे आवाहनही म्हणजे कोरोनाच्या निमित्तानं कर्ज माफ करण्याची मोहीम मानली जात आहे.ट्विटर आणि अन्य सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओ संदेशात इम्रान खान यांनी जगाच्या वित्तीय संस्थांना आवाहन केले आहे की, या संकटाच्या काळात पाकिस्तानसारख्या कर्जबाजारी देशांसाठी काही तरी ठोस मोहीम राबवावी. या मोहिमेअंतर्गत विकसनशील देशांचे कर्ज माफ करण्यात यावं, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Coronavirus: आमचा भूकबळी जाण्यापासून वाचवा, इम्रान खान यांनी जगापुढे पसरले हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 09:50 IST
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेल्या सार्क देशांसाठीच्या फंडातून पाकिस्तानने कोरोनाविरुद्ध लढण्याच्या नावाखाली पैशांची मागणी केली होती.
Coronavirus: आमचा भूकबळी जाण्यापासून वाचवा, इम्रान खान यांनी जगापुढे पसरले हात
ठळक मुद्देकोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलेलं असून, पाकिस्तानातही परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे.कर्जबाजारी झालेल्या पाकिस्तानची कोरोना व्हायरसच्या संकटाशी दोन हात करताना अक्षरशः नाकीनऊ येत आहे. लॉकडाऊनमुळे देशभरात सर्व व्यवसाय बंद पडल्यामुळे आता पाकिस्तानात उपासमारीची समस्या निर्माण झाली आहे.