शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

CoronaVirus : भारतात कोरोनाचा हाहाकार; पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ट्विट करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 16:58 IST

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,46,786 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2,624 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,66,10,481 वर पोहोचली आहे.

नवी दिल्ली - भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. यातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी भारतीय लोकांप्रति संवेदना व्यक्त केली आहे. ते म्हणाले, सर्वांनी मिळून या जागतिक संकटाचा सामना करायला हवा. (CoronaVirus Pakistan pm Imran Khan tweeted about corona virus crisis in india know what he says)

इम्रान खान यांनी शनिवारी ट्विट करत म्हटले आहे, की 'मी भारतीयांप्रति एकता व्यक्त करू इच्छितो. ते कोरोनाच्या घातक लाटेचा सामना करत आहेत. आम्ही आमच्या शेजारील आणि जगातील कोरोनाने पीडित सर्व लोक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो.' तसेच आपण सर्वांनी एकत्रितपणे या जागतिक संकटाचा सामना करायला हवा, असेही इम्रान यांनी म्हटले आहे. 

CoronaVirus : IPS अधिकारी बनला देवदूत, मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले 78 रुग्ण

याशिवाय पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनीही भारतीयांप्रति शनिवारी सहानुभूती व्यक्त केली. कुरेशी म्हणाले, की कोविड-19 संकट सांगते, की मानवी प्रश्नांवर राजकारणापलिकडे जाऊन पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

Corona Vaccine : कोरोना लस घेतल्यानंतर महिलेच्या अंगावर आले रक्ताचे फोड, पाय कापावा लागण्याची सतावतेय भीती

ते म्हणाले, 'कोविड-19 संक्रमणाने आपल्या भागात कहर केला आहे. सध्याच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आम्ही भारतीयांप्रति समर्थन व्यक्त करतो. तसेच पाकिस्तानातील कोलांच्या वतीने, मी भारतात प्रभावित कुटुंबीयां प्रति सहानुभूती व्यक्त करतो.'  ते म्हणाले, या महामारीचा सामना करण्यासाठी पाकिस्तान सार्क देशांच्या सोबतीने काम करत आहे.

भारतात कोरोनाचा धोका वाढतोय -गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,46,786 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2,624 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,66,10,481 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,89,544 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (24 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,89,544 वर पोहोचला आहे. 

CoronaVirus : शरीरातील ऑक्सीजन स्तर कमी होऊ लागला, तर करा 'हा' उपाय; आरोग्य मंत्रालयानं दिलीय माहिती

पाकिस्तानातील स्थिती - पाकिस्तानात गेल्या 24 तासांत 157 जणांचा कोरोना संक्रमणाने मृत्यू झाला. तर 5,908 नवे रुग्ण समोर आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, संक्रमणामुळे एका दिवसात होणाऱ्या मृत्यूंचा हा आकडा गेल्या वर्षानंतरचा सर्वात मोठा आकडा आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयाने म्हटले आहे,  की 157 पैकी 53 रुग्णांनी व्हेंटीलेटरवर असतानाच अखेरचा श्वास घेतला आहे. पाकिस्तानात कोरोनामुळे आतापर्यंत 16,999 जणांचा मृत्यू झाला आहे, तर तर एकूण 7,90,016 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

कोरोना काळात अचानक पैशांची गरज पडली तर! जाणून घ्या, कुठून होऊ शकते तत्काळ व्यवस्था?

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याImran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान