शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण पण क्रॉस व्होटिंग कुणाचा खेळ बिघडवणार?
2
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
3
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
4
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
5
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
6
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
7
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
8
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
9
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
10
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
11
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
12
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
13
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
14
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
15
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
16
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
17
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
18
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
19
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
20
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला

CoronaVirus हाहाकार! जगभरात ११ लाखांहून अधिक रुग्ण; ६२ हजार बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 07:18 IST

अमेरिका आणि युरोपमध्ये हाहाकार;कोरोना विषाणूमुळे झालेल्या प्रादुर्भावाने अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक म्हणजेच 3 लाखांहून रुग्ण असून चिंतेची बाब म्हणजे गेल्या २४ तासांत तिथे १३ हजारांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. २०० देशांमध्ये ८.५ लाख लोकांवर रुग्णालयांत उपचार सुरू. ६२,६९१ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : डिसेंबरअखेरीस चीनमध्ये सुरू झालेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने आता जगभरात हाहाकार माजवला असून अमेरिका आणि युरोपीयन देशांमध्ये हा आजारा वेगाने पसरत चालला आहे. आतापर्यंत जगात ११ लाख, ६७ हजार जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी ६२ हजार, ६९१ जण मृत्युमुखी पडले आहेत.जगातील सुमारे २०० देशांंंमधील विविध रुग्णालयांमध्ये ८ लाख, ५० हजारांहून अधिक लोकांवर सध्या उपचार सुरू असून त्यातील ४० हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे, ८ लाख, ११ हजार रुग्णांमध्ये कोरोनीची लक्षणे अतिशय सौम्य आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

कोरोना विषाणूमुळे झालेल्या प्रादुर्भावाने अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक म्हणजेच 3 लाखांहून रुग्ण असून चिंतेची बाब म्हणजे गेल्या २४ तासांत तिथे १३ हजारांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत ७ हजार,९०० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे आणि त्यात ४५० जण गेल्या २४ तासांत मरण पावले आहेत. न्यूयॉर्क आणि परिसरात सर्वाधित रुग्ण आढळले आहेत. येथील बाधितांचा आकडा दररोज वाढत आहे.

अमेरिकेखालोखाल कोरोनाने ज्या देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे त्यापैकी बहुतांश देश युरोपातील आहेत. आतापर्यंत इटलीमध्ये १४ हजार, ७०० तर स्पेनमध्ये ११ हजार, ८०० लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. फ्रान्समध्ये (६,५००), ब्रिटन (४,३१५), इराण (३,५००), जर्मनी (१,३३०), नेदरलँड (१,६५०) तर बेल्जीयम (१,३००) असे मृत्यू झाले आहेत. चीनमध्ये मात्र गेल्या दोन दिवसांत कोरोनामुळे केवळ चारच जणांचा मृत्यू झाला असून तेथील आतापर्यंतच्या मृतांची संख्या १,३२६ एवढी झाली आहे.देशात सर्वाधिक रूग्ण २१ ते ४० वयोगटातीलनवी दिल्ली : देशातील कोरोना बाधितांमध्ये २१ ते ४० वर्षे वयोगटातील सर्वाधिक ४२ टक्के रूग्ण असल्याची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. प्रत्येकी १०० पैकी ४२ रूग्ण या वयोगटातील आहेत. सर्वात कमी धोका ० ते २० वर्षे वयोगटातील लोकांना आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले. देशात सध्या २ हजार ९०२ रूग्ण आहेत. शुक्रवारी ६०१ रूग्णांची नोंद झाली. ४१ ते ६० वयोगटातील रूग्ण ३३ टक्के तर ६० पेक्षा जास्त वय असलेले रूग्ण १७ टक्के आहेत. मृत्यू झालेल्या सर्व रुग्णांना कोणता ना कोणता आजार होता. त्यात प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वसन विकार, किडनीशी संबधित आजार असल्याचे निष्पन्न झाले, असेही अगरवाल म्हणाले.

मरकजमधील बाधितांमध्ये वाढदिल्लीमध्ये झालेल्या धार्मिक संमेलनाला गेलेल्यांपैकी १०२३ जणांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांपैकी एक तृतीयांश जण तबलीगी जमातशी संबंधित आणि त्यांच्या संपर्कात आलेले आहेत आणि ते देशाच्या १७ राज्यांमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाchinaचीन