शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

CoronaVirus News : कोरोनाची लढाई जिंकले, 13 लाख लोक बरे होऊन घरी परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 15:29 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 3,932,626 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 1,349,138 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 271,017 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 39 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 3,932,626 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 1,349,138 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.

जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत असतानाच एक दिलासादायक बाब समोर आली आहे. जवळपास 13 लाख लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली असून कोरोनावर मात केली आहे. 1,349,138 लोक कोरोनातून बरे झाले असून त्यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन याच्या माध्यमातून खबरदारी घेण्यात येत आहे. 

कोरोनाग्रस्तांचा आकडा हा वाढत असला तरी याच दरम्यान काही दिलासादायक बातम्याही समोर आल्या आहेत. अनेक लोकांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसेच काही रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. जगभरातील विविध रुग्णालयात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील तब्बल 13 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच 13 लाखांहून अधिक लोक बरे होऊन घरी परतल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरकडे अमेरिकेसह इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देश कोरोनाचा सामना करत असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठीदेशातील लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 56 हजारांवर गेला आहे. 1800 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाला रोखणारा आयुर्वेदिक काढा, 6000 लोकांवर चाचणी केल्याचा गुजरात सरकारचा दावा

CoronaVirus News : दारूमुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा, 'या' सरकारने सुरू केली 'ऑनलाईन टोकन' व्यवस्था

CoronaVirus News : धक्कादायक! डोळ्यांमधूनही होतो कोरोनाचा संसर्ग; संशोधकांचा दावा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAmericaअमेरिकाDeathमृत्यू