शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

CoronaVirus News: मस्तच! कोरोना चाचणीचा निष्कर्ष मिनिटात कळणार; श्वासाच्या आधारे झटक्यात निदान होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 13:31 IST

CoronaVirus News: श्वासाच्या आधारे कोरोना चाचणी होणार; एका मिनिटात निष्कर्ष समजणार

सिंगापूर: कोरोना चाचणी झाल्यानंतर त्याचा अहवाल मिळण्यासाठी लागणारा वेळ अनेकदा प्रादुर्भावासाठी कारणीभूत ठरतो. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींना अहवाल मिळवण्यासाठी काही तासांचा कालावधी लागतो. काही ठिकाणी तर अहवाल प्राप्त होण्यास एक ते दोन दिवस लागतात. सिंगापूरमधील एका स्टार्ट अपनं यावर एक उपाय शोधून काढला आहे. सिंगापूरमधील प्राधिकरणानं कोविड-१९ ब्रेदलायझरच्या चाचणीला परवानगी दिली आहे.मेड इन इंडिया 'कोवॅक्सिन'बद्दल मोठी बातमी! कोरोनाविरुद्धच्या लढ्याला 'बूस्ट' मिळणारएखाद्या व्यकीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही, याची माहिती अवघ्या एका मिनिटात ब्रेदलायझरच्या माध्यमातून मिळू शकते. सिंगापूरमधील ब्रेदॉनिक्स या स्टार्ट अपनं ब्रेदलायझरची निर्मिती केली आहे. सिंगापूरच्या राष्ट्रीय विद्यापीठातील ब्रेदॉनिक्स सध्या आरोग्य मंत्रालयासोबत काम करत असून ब्रेदलायझर तंत्रज्ञानाच्या चाचण्या सुरू आहेत. यासाठी मलेशियाला लागून असलेल्या एका भागाची निवड करण्यात आली आहे. सध्या सिंगापूरमध्ये अँटिजन टेस्ट करण्यात येतात. त्यासोबतच आता ब्रेदलायझरच्या चाचणीलादेखील सुरुवात होईल.जगात कोरोना पसरण्याआधी चीनच्या 'त्या' लॅबमध्ये काय घडलं?; धक्कादायक माहिती उघडब्रेदलायझरच्या माध्यमातून करण्यात आलेल्या ९० टक्के चाचण्या अचूक ठरल्याचा दावा ब्रेदॉनिक्स कंपनीनं केला. देशातील प्राधिकरणानं ब्रेदलायझरच्या चाचणीला परवानगी दिल्याची माहिती आरोग्य विज्ञान प्राधिकरणाच्या संकेतस्थळानं दिली. ब्रेदलायझरच्या माध्यमातून चाचणी करताना प्रत्येकवेळी वेगळ्या माऊथपीसचा वापर केला जातो. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याचा धोका नाही. चाचणी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीनं ब्रेदलायझरमध्ये श्वास सोडल्यानंतर त्यातील केमिकल कंपाऊंड्सचं विश्लेषण केलं जातं. त्यानंतर संबंधित व्यक्तीला कोरोना झाला आहे की नाही, याचा निष्कर्ष काढला जातो. चाचणीत एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळ्यास त्यानंतर तिची पीसीआर चाचणी केली जाते, अशी माहिती कंपनीनं दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या