शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! क्वारंटाईनच्या भीतीने लोकांची पळापळ; शांघायमधील धक्कादायक Video 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 5:47 PM

CoronaVirus News : चीनमधील सर्वात महत्त्वाचं शहर असलेल्या शांघाय येथून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये लोक क्वारंटाईनच्या भीतीने स्टोरमधून बाहेर पळताना दिसत आहेत.

कोरोना महामारीमुळे चीनमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. देशाच्या अनेक भागातून संसर्गाची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. प्रशासन सतर्क आहे. याच दरम्यान, चीनमधील सर्वात महत्त्वाचं शहर असलेल्या शांघाय येथून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये लोक क्वारंटाईनच्या भीतीने स्टोरमधून बाहेर पळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शांघायमधील Ikea स्टोअरचा आहे. लोक इथे खरेदीसाठी आले होते. पण अचानक एक खरेदीदार कोरोना रुग्णाच्या अत्यंत जवळ असल्याची माहिती समोर आली आणि एकच गोंधळ उडाला. 

शहराच्या आरोग्य अधिकार्‍यांनी कोरोना रुग्णाच्या संपर्कात असलेल्या त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी स्टोअर बंद करण्याचे तातडीने आदेश जारी केले, त्यानंतर स्टोअरमध्ये एकच खळबळ उडाली. दुकान बंद करण्याचा आदेश येताच लोकांनी आयकेईए शोरूममधून पळ काढण्याचा प्रयत्न सुरू केला. अधिकाऱ्यांनी त्यांना रोखण्यासाठी मुख्य गेट बंद करण्याचा प्रयत्न केला असला तरी मोठ्या संख्येने लोक दुकानातून बाहेर येण्यासाठी सर्व प्रयत्न करत होते. आरडाओरडा करत होते. 

एकीकडे मोठ्या संख्यने लोक गेटमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत होते, तर दुसरीकडे अधिकारी त्यांना रोखण्यासाठी दरवाजा बंद करताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत, मात्र त्यांचा अपयश येत होतं. कारण लोकांची गर्दी एवढी होती की अधिकारी काही करू शकले नाहीत आणि बघता बघता सर्व लोक स्टोरमधून पळून गेले. या घटनेशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शांघायच्या लोकांना या वर्षाच्या सुरुवातीला दोन महिने कडक लॉकडाऊनचा सामना करावा लागला. 

चीन सरकारने शून्य कोविड धोरणांतर्गत कोरोना प्रकरणांची वाढ रोखण्यासाठी शांघायमध्ये दोन महिन्यांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा केली. शांघाय हेल्थ कमिशनचे डेप्युटी डायरेक्टर झाओ डंडन यांनी रविवारी सांगितले की Ikea स्टोअर तात्काळ बंद करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. कारण तिबेटमधील ल्हासा येथून एक मुलगा परतला होता, ज्याच्या संपर्कात आलेला एक जण शोरूममध्ये आला होता. त्याच व्यक्तीचा शोध घेण्यासाठी दुकान लगेचच बंद करण्याचे आदेश देण्यात आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या