CoronaVirus News: खूशखबर! फायझरची लस ९०% प्रभावी; लवकरच विक्रीला मंजुरी?

By कुणाल गवाणकर | Published: November 9, 2020 09:33 PM2020-11-09T21:33:28+5:302020-11-09T21:34:34+5:30

CoronaVirus Vaccine News: फायझरची कोरोना लस तिसऱ्या टप्प्यात; लवकरच विक्रीला परवानगी मिळण्याची शक्यता

coronavirus news Pfizer Vaccine Proves 90 Percent Effective In Trials | CoronaVirus News: खूशखबर! फायझरची लस ९०% प्रभावी; लवकरच विक्रीला मंजुरी?

CoronaVirus News: खूशखबर! फायझरची लस ९०% प्रभावी; लवकरच विक्रीला मंजुरी?

Next

वॉशिंग्टन: अमेरिकेसह युरोपीय देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. युरोपातल्या अनेक देशांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या परिस्थितीत आता आशेचा एक किरण दिसू लागला आहे. फायझर कंपनीची कोरोना लस नुकत्याच झालेल्या चाचणीत ९० टक्के यशस्वी ठरली आहे. पुढील काही चाचण्या व्यवस्थित पार पडल्यास आणि सर्व परवानग्या वेळेत मिळाल्यास फायझरला याच महिन्याच्या अखेरपर्यंत लस विक्रीची परवानगी मिळू शकते.

फायझर औषध क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. अमेरिकेत मुख्यालय असलेली फायझर बायोएनटेक या जर्मन कंपनीसोबत कोरोनावरील लस तयार करत आहे. तिसऱ्या टप्प्यात लसीची ९४ कोरोना रुग्णांवर चाचणी घेण्यात आली. त्यापैकी ९० टक्के रुग्णांवर लसीचा सकारात्मक परिणाम दिसल्याची माहिती फायझरनं दिली आहे. लसीची चाचणी करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचं किमान एक लक्षण होतं.

फायझरच्या लसीची चाचणी अद्याप संपलेली नाही. मात्र ही लस तिसऱ्या टप्प्यात ९० टक्के यशस्वी ठरल्यानं अपेक्षा उंचावल्या आहेत. बहुतांश रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसल्यानं फायझरची लस लवकरच बाजारात दाखल होऊ शकते. कोरोनामुळे आतापर्यंत जगात १२ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक देशांमध्ये आता कोरोनाची दुसरी लाट आल्यानं धोका अधिक वाढला आहे.

कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचणीच्या निष्कर्षांची माहिती आज फायझरनं दिली. 'ज्या स्वयंसेवकांवर लसीची चाचणी घेण्यात आली, त्यातल्या ९० टक्के स्वयंसेवकांच्या शरीरातला कोरोना विषाणू रोखण्यात लसीला यश आलं. आणखी काही चाचण्यांमधूनही असेच निष्कर्ष हाती आल्यास लस सुरक्षित असल्याचं सिद्ध होईल. त्यानंतर कंपनी आरोग्य नियमकांकडे लस विकण्यासाठी अर्ज करेल,' असं कंपनीनं सांगितलं.

Web Title: coronavirus news Pfizer Vaccine Proves 90 Percent Effective In Trials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.