CoronaVirus News: oxford university scientist makes vaccine on covid-19, apply on monkey rkp | CoronaVirus News : शास्त्रज्ञांना मोठं यश, कोरोना लसीचा माकडांवर सकारात्मक परिणाम, माणसांवरही चाचणी सुरू  

CoronaVirus News : शास्त्रज्ञांना मोठं यश, कोरोना लसीचा माकडांवर सकारात्मक परिणाम, माणसांवरही चाचणी सुरू  

ठळक मुद्देकोरोनावर मात करण्यासाठी लस किंवा औषध तयार करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ अहोरात्र मेहनत करत आहेत.शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या लसीचे माकडांवर प्रात्यक्षिक करुन पाहिले आणि त्यांना सकारात्मक परिणाम झाल्याचे आढळून आले. त्यामुळे अनेकांच्या मनात आशा निर्माण झाली आहे.

जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी लस किंवा औषध तयार करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ अहोरात्र मेहनत करत आहेत. यातच ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी कोरोनावरील लस तयार केल्याची एक दिलासादायक बातमी आली आहे. या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या लसीचे माकडांवर प्रात्यक्षिक करुन पाहिले आणि त्यांना सकारात्मक परिणाम झाल्याचे आढळून आले. त्यामुळे अनेकांच्या मनात आशा निर्माण झाली आहे.

शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या लसीचे प्रात्यक्षिक सहा माकडांच्या समूहावर करण्यात आले. त्यानंतर या लसीचे सकारात्मक परिणाम झाल्याचे तपासात आढळून आले आहे. ब्रिटिश आणि अमेरिकन संशोधकांच्या म्हणण्यानुसार, आता या लसीची चाचणी माणसांवरही सुरु आहे. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, माकडांमध्ये कोरोनाचा संसर्ग सोडण्याआधी त्यांना ही लस देण्यात आली होती. यादरम्यान असे आढळून आले की १४ दिवसांच्या आत काही माकडांच्या शरीरात कोरोनाविरूद्ध अँटी-बॉडी विकसित झाले तर काही माकडांना अँटी बॉडी विकसित करण्यासाठी २८ दिवस लागले. या लसला सुरुवातीच्या संशोधनानंतर इतर शास्त्रज्ञांच्या रिव्यूनंतर मान्यता मिळणे अद्याप बाकी आहे. 

ब्रिटीश औषधं निर्मिती कंपनी AstraZenecaने गेल्या महिन्यात जाहीर केले होते की, त्यांनी ऑक्सफोर्ड वॅक्सीन ग्रुप आणि जेनर इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांना एकत्र आणले आहे. शास्त्रज्ञांची टीम कोरोनाविरोधात लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडीसीनचे प्राध्यापक स्टीफेन इवान्स ने सांगितले की, "माकडांवरील प्रात्यक्षिके केल्यानंतर जे परिणाम आले आहेत. ते पाहता निश्चिपणे एक आनंदाची बातमी आहे." शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, एक हजार लोकांना ट्रायल म्हणून स्वेच्छेने लस देण्यात आली आहे. पुढील महिन्यात काही स्पष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 

आणखी बातम्या...

"पॅकेज म्हणजे 'सिरियल' नव्हे, पंतप्रधानांनी 'प्रोमो' दाखवावा अन् अर्थमंत्र्यांनी रोज 'एपिसोड' सादर करावा"

CoronaVirus News : आणखी दोन आठवडे लॉकडाऊन वाढवा, 'या' राज्याची केंद्राकडे मागणी

Reliance Jioचा नवीन धमाका, दरदिवशी मिळणार ३ जीबी डेटा...

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: oxford university scientist makes vaccine on covid-19, apply on monkey rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.