CoronaVirus News : अमेरिकेत एकाच दिवसात आढळले ६६ हजारांहून अधिक नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 07:32 AM2020-07-13T07:32:55+5:302020-07-13T07:33:20+5:30

जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांमध्ये अमेरिका प्रथम स्थानी, ब्राझिल दुसऱ्या व भारत तिसºया क्रमांकावर आहे.

CoronaVirus News: More than 66,000 new patients found in the United States in a single day | CoronaVirus News : अमेरिकेत एकाच दिवसात आढळले ६६ हजारांहून अधिक नवे रुग्ण

CoronaVirus News : अमेरिकेत एकाच दिवसात आढळले ६६ हजारांहून अधिक नवे रुग्ण

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये एकाच दिवसात ६६ हजारांहून अधिक इतक्या विक्रमी संख्येने कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे येथील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३२ लाखांवर गेली आहे. अमेरिकेत कोरोनाने माजविलेला हाहाकार लवकर थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.
जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ३२,४२,०७३ इतकी झाली आहे. कोरोनाच्या संसगार्मुळे त्या देशात शनिवारी आणखी ७६० जणांचे बळी गेले. त्यामध्ये मृतांचा एकूण आकडा १,३४, ७२९ झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून अमेरिकेत दररोज कोरोनाचे ६० हजारहून अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांमध्ये अमेरिका प्रथम स्थानी, ब्राझिल दुसऱ्या व भारत तिसºया क्रमांकावर आहे.
दुसºया बाजूला काही चांगल्या गोष्टीही घडत आहेत. डिस्ने वर्ल्डने आपल्या चार ओरलँडो थीम पार्कपैकी दोन पार्क शनिवारपासून जनतेसाठी खुली केली. त्या पार्कमध्ये जाण्यासाठी नागरिकांनी तिकीटांचे आगाऊ आॅनलाइन आरक्षण केले होते. पर्यटकांच्या शरीराचे तापमान तपासून व हँड सॅनिटायझर लावल्यानंतरच त्यांना या पार्कमध्ये प्रवेश देण्यात येत होता.
अमेरिकेतील कोरोना साथीचा मोठा फैलाव लक्षात घेऊन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सार्वजनिक ठिकाणी पहिल्यांदाच शनिवारी मास्क परिधान केला होता. ते वॉल्टर रिड लष्करी रुग्णालयात काही रुग्णांच्या ्प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. ट्रम्प यांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क परिधान करावा अशी सहकाऱ्यांनी केलेली विनंती अखेर त्यांनी मान्य केली.

ब्राझिलमध्ये आणखी ३९ हजार रुग्ण
ब्राझिलमध्ये गेल्या चोवीस तासात कोरोनाचे ३९,००० नवे रुग्ण आढळून आले. याच कालावधीत त्या देशात आणखी एक हजारपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ब्राझिलमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १,८३९,८५० इतकी झाली असून आतापर्यंत ७१,४६९ जणांचा बळी गेला आहे. या देशात आतापर्यंत १० लाखांहून अधिक लोक कोरोनाच्या आजारातून बरे झाले आहेत. तिथे शुक्रवारी कोरोनाचे ४५ हजार नवे रुग्ण आढळून आले होते.

Web Title: CoronaVirus News: More than 66,000 new patients found in the United States in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.