CoronaVirus News: पर्यटक येण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 04:37 IST2020-05-02T04:37:12+5:302020-05-02T04:37:31+5:30
देशातील पर्यटन पूर्ववत कसे करता येईल, याबाबत आता विचारमंथन सुरू केले आहे.

CoronaVirus News: पर्यटक येण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू
बीजिंग : कोरोनामुळे (कोविड-१९) जगभरातील पर्यटन आणि व्यापार ठप्प पडला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविल्यानंतर चीनने अंतर्गत लॉकडाऊन शिथील केले आहे. पाठोपाठ देशातील पर्यटन पूर्ववत कसे करता येईल, याबाबत आता विचारमंथन सुरू केले आहे.
चायना टुरिझम अॅकॅडमी आणि ट्रीप डॉट कॉम यांच्या वतीने नुकतेच आॅनलाईन टुरिझम परिषद घेण्यात आली. कोरोनामुळे प्रभावित झालेला पर्यटन उद्योग पूर्ववत करण्यासाठी काय करता येईल याबाबत यात चर्चा करण्यात आली. या व्हिडिओ सेमिनारमधे तब्बल ४ हजारांहून अधिक प्रतिनिधींनी हजेरी लावली. त्यात पर्यटन तज्ञ, व्यावसायिक, पर्यटन महाविद्यालय आणि विद्यापीठांचे प्रतिनिधी
आणि प्राध्यापकांचा समावेश होता.