शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
2
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
6
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
7
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
8
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
9
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
10
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
11
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
12
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
13
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
14
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
15
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
16
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
17
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
18
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
19
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
20
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन

China Coronavirus : जगाला 'कोरोना'चा विळखा! आरोग्यमंत्र्यांनाच झाली लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 3:42 PM

China Coronavirus : चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे 48 देशांतील लोकांना त्याची लागण झाली आहे.

ठळक मुद्देचीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे 48 देशांतील लोकांना त्याची लागण झाली आहे. कोरोनामुळे तब्बल 2,802 जणांचा मृत्यू झाला आहे.तब्बल 82,059 लोकांना त्याचा संसर्ग झाला आहे.

बीजिंग - चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने जगाला विळखा घातला आहे. चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे 48 देशांतील लोकांना त्याची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे जगभरात चिंतेचे वातावरण असून, 40 हून अधिक देशांनी हाय अलर्ट घोषित केला आहे. कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल 2,802 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 82,059 लोकांना त्याचा संसर्ग झाला आहे. तसेच चीननंतर दक्षिण कोरिया आणि इराणमध्ये कोरोनाच्या संसर्ग झाला आहे. 

इराणमध्ये 15 जणांचा मृत्यू झाला असून 95 हून अधिक जणांना लागण झाली आहे. इराणचे उप आरोग्यमंत्री इराज हरीची यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. हरीची यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. रविवारी (24 फेब्रुवारी) कोरोनामुळे 150 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या 150 पैकी 149 नागरिक हे हुबेई प्रांतातील असल्याची माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच 409 नवीन रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. 

अवघ्या 17 दिवसांच्या बाळाने कोरोनावर मात केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे कोणतेही उपचार न घेता या बाळाने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. या 17 दिवसांच्या बाळाच्या शरीरात कोरोना व्हायरस नसून त्याचं आरोग्य उत्तम असल्याची माहिती मिळत आहे. सीओ सीओ (Xiao Xiao) असं या बाळाचं नाव आहे. चीनमध्ये एका गर्भवती महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे गर्भातच बाळाला कोरोनाचा संसर्ग झाला. 

गेल्या महिन्यापासून चीनमध्ये अडकून पडलेल्या 90 भारतीयांची आरोग्य तपासणी बुधवारी झाली. त्यानंतर आज शुक्रवारी पहाटे राजधानी दिल्ली येथे त्यांचे आगमन झाले. रोगाच्या विळख्यात अडकलेल्या भारतीयांनी मायभूमीवर पाऊल ठेवताच सुटकेचा निश्वास टाकला. साताऱ्याच्या कन्या अश्विनी पाटील यांनीही मायभूमीत येताच आनंद व्यक्त करत, लोकमतने दाखवलेल्या तत्परतेचे आभार मानले.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्याची कन्या असलेल्या अश्विनी पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर, सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून ते भारतीय दूतावासाशी संपर्कात होते. तर, भारतीय दुतावास चीन सरकारशी समन्वय साधत होता. अखेर बुधवारी चीनमध्ये अडकलेल्या 90 भारतीयांची तपासणी झाली. त्यांना भारतात आणण्यासाठी वुहान येथे विमान पाठविण्यात आले. आज पहाटेच्या सुमारास या सर्वच भारतीयांची घरवापसी झाली. आपल्या भारत भेटीनंतर सर्वांनीच अत्यानंद व्यक्त केला. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Violence : 'दिल्ली हिंसाचारावर राजकीय पक्षांकडून घाणेरडं राजकारण'

Delhi Violence : गृहमंत्री अमित शाह यांना हटवा, सोनिया गांधींची राष्ट्रपतींकडे मागणी

Delhi Violence: आप नगरसेवक ताहीर हुसैन यांच्या घरात सापडला दगड-विटा, पेट्रोल बॉम्बचा साठा 

Delhi Violence: हिंसाचार प्रकरणावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीश एस. मुरलीधर यांची तातडीनं बदली, कारण...

Delhi Violence: दिल्ली हिंसाचारातील पीडित बेघर मुस्लीम कुटुंबीयांना दिला हिंदू परिवाराने आसरा

 

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीनDeathमृत्यूIndiaभारत