शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...
2
Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",
3
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा
4
काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
5
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे सोपवले वेळापत्रक
6
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ
7
आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...
8
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त
9
अम्पायरशी भिडणं Matthew Wade च्या अंगलट; ऑस्ट्रेलियन खेळाडूला ICC चा सज्जड दम
10
२८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश
11
"पक्षाचा आदेश पाळावाच लागणार"; अजितदादांसमोर सुनिल तटकरेंनी मुंडे, मुश्रीफ सगळ्यांनाच सुनावलं
12
भारत-पाक सामन्यानंतर MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन; देवेंद्र फडणवीसांशी होतं जवळचं नातं
13
... तर विधानसभेला काँग्रेसचे सगळे उमेदवार पाडणार; मनोज जरांगे का संतापले?
14
दोन वर्ष डेट केल्यानंतर बनले आयुष्याचे जोडीदार; जसप्रीत-संजनाची भारी लव्ह स्टोरी
15
या ₹3 च्या स्टॉकवर गुंतवणूकदारांच्या उड्या! LIC कडे तब्बल 97 लाख शेअर, कंपनीने घेतलाय मोठा निर्णय
16
काल शपथ अन् आता मंत्रिपद सोडण्याची इच्छा? सुरेश गोपी यांनी स्वतः केला खुलासा, म्हणाले...
17
मोठी बातमी: अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल; भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देणार?
18
PM Narendra Modi : जेडीयू-टीडीपी की भाजप, कोणाला मिळणार लोकसभा अध्यक्षपद? नेमकी चर्चा कोणाची
19
Love Life: 'या' राशीची बायको मिळाली तर तुमची काळजीच मिटली म्हणून समजा!
20
IND vs PAK : "पाकिस्तानला शत्रूची गरज नाही कारण ते...", वसीम अक्रमची संतप्त प्रतिक्रिया

CoronaVirus News: उन्हामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होईल की वाढेल? संशोधकांनी दिली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 8:39 PM

कॅनडातील मॅकमास्टर युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वात झालेल्या एका अभ्यासात संशोधकांनी, यासंदर्भात होत असलेल्या व्यापक वैज्ञानिक चर्चे विषयी माहिती दिली आहे. यात वातावरण बदलाचा विशेषतः गरमीच्या दिवसांचा कोरोना पसरण्याच्या वेगावर काय परिणाम होतो, यावर भाष्य करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसंशोधक सांगतात, की इन्फ्लुएंझा आणि SARS सारखे आजार कमी तापमानात आणि आर्द्रतेत तयार होतात.अधिक तापमान आणि आर्द्रतेमध्ये एक टक्क्याने वाढ झाली, तर COVID-19चे रुग्ण तीन टक्क्याने कमी होतात.SARS-CoV-2वर वातावरण बदलाचा काय परिणाम होतो, हे 'सर्वसाधारणपणे आपल्या दैनंदीन व्यवहारांवरील निर्बंधांवरच अवलंबून आहे. 

टोरंटो : एकिकडे उन्हामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा वेग कमी होईल, असे बोलले जात आहे. मात्र, असे असतानाच एका अभ्यासात धक्कादायक दावा करण्यात आला आहे. या अभ्यासात म्हणण्यात आले आहे, की अधिक काळ उन्ह राहिल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढेल. मात्र, हे उन्हाच्या व्हायरसवरील परिणामांसंदर्भात नाही, तर लोकांच्या सवयींसंदर्भात म्हणण्यात आले आहे.

‘जिओग्राफिकल अॅनालेसिस’मध्ये छापून आलेल्या एका अभ्यासात म्हणण्यात आले आहे, की उन्ह पडू लागल्याने लोक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत आहेत. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढतो. 

भारतात नेमका कसा आणि कुठून आला कोरोना? संशोधकांनी केला मोठा खुलासा, सांगितलं बरंच काही

कॅनडातील मॅकमास्टर युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वात झालेल्या एका अभ्यासात संशोधकांनी, यासंदर्भात होत असलेल्या व्यापक वैज्ञानिक चर्चे विषयी माहिती दिली आहे. यात वातावरण बदलाचा विशेषतः गरमीच्या दिवसांचा कोरोना पसरण्याच्या वेगावर काय परिणाम होतो, यावर भाष्य करण्यात आले आहे.

संशोधक सांगतात, की इन्फ्लुएंझा आणि SARS सारखे आजार कमी तापमानात आणि आर्द्रतेत तयार होतात. तर COVID-19 पसरवणाऱ्या व्हायरस SARS-CoV-2संदर्भात फारशी माहिती नाही. तसेच अर्थव्यवस्थेला लवकरात लवकर उघडण्याचा मोठा दबाव आहे. पण उन्हाळ्याच्या दिवसांत, असे करणे योग्य ठरले का? हेदेखील अनेकांना जाणून घ्यायचे आहे, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

दिलासादायक : जगातल्या 'या' पहिल्या शहरात 'हर्ड इम्यूनिटी'नं होतोय कोरोनाचा खात्मा! पण...

मॅकमास्टर युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि प्रमुख अभ्यासक अंतोनियो पायेजा यांनी सांगितले, की SARS-CoV-2वर वातावरण बदलाचा काय परिणाम होतो, हे 'सर्वसाधारणपणे आपल्या दैनंदीन व्यवहारांवरील निर्बंधांवरच अवलंबून आहे. 

यासंशोधनात दिसून आले, की अधिक तापमान आणि आर्द्रतेमध्ये एक टक्क्याने वाढ झाली, तर COVID-19चे रुग्ण तीन टक्क्याने कमी होतात. याचाच दुसरा अर्थ, अधिक तापमानामुळे व्हायरसची क्षमता कमी होणे असाही होतो.

दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही

संशोधकांनी म्हटले आहे, अधिक वेळ सूर्य राहिल्यानंतर अधिक रुग्ण वाढलेले दिसत आहेत. संसोधक म्हणतात, की याचा संबंध मानवाच्या व्यवहाराशी असू शकतो. कारण अधिक वेळ दिवस राहिल्याने लोक लॉकडाउनच्या नियमांचे पालन करत नाहीत आणि घराबाहेर पडतात. हेही यामागचे एक कारण असू शकते.

Corona Vaccine Update: या भारतीय कंपनीमध्ये तयार होतेय कोरोनाची 'सर्वात अ‍ॅडव्हान्स्ड' व्हॅक्‍सीन

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस