शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरस आला! संक्रमणाचा धोका दहापटीने वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 12:21 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनावर संशोधन सुरू आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

क्वालालंपूर - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जगभरात यावर संशोधन सुरू आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मलेशियात कोरोना व्हायरसचा नवा प्रकार समोर आला आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हायरस कोरोनापेक्षा 10 पट जास्त धोकादायक आहे. डी 614 जी (D614G) असं या व्हायरसचं नाव असून यामुळे चिंतेत भर पडली आहे. 

रिपोर्टनुसार, मलेशियातील एका रेस्टॉरंटच्या मालकामध्ये हा व्हायरस सर्वप्रथम आढळला. रेस्टॉरंटचा मालक भारतातून परत आला होता. त्यामुळे त्याला 14 दिवस क्वारंटाईन होण्यास सांगितले होते. मात्र या व्यक्तीने 14 दिवसांच्या क्वारंटाईनचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पाच महिन्यांची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मलेशियामध्ये D614G व्हायरसची 3 प्रकरणं समोर आली आहेत 45 लोकांपैकी तीन जणांमध्ये हा व्हायरस आढळून आला आहे. 

अमेरिकेच्या डॉ. फॉसी यांनी या व्हायरसमुळे कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होऊ शकतो असं म्हटलं आहे. मलेशियाच्या आरोग्य विभागाचे डायरेक्टर जनरल नूर हिशाम अब्दुल्ला यांनी देखील कोरोना व्हायरसच्या या नव्या प्रकारामुळे गंभीर परिणाम पाहायला मिळू शकतात. आतापर्यंत लस तयार करण्यासाठी आणि व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी  विकसित करण्यात आलेली नवी पद्धतही यापुढे फेल होऊ शकते. या व्हायरसचा प्रसार हा अनेक देशांमध्येही होऊ शकतो. 

मलेशियामध्ये डी 614 जी हा व्हायरस आढळून आल्याने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आरोग्य विभागाची देखील चिंता वाढली आहे. मात्र लोकांनी अधिक सावधानता बाळगणे गरजेचं आहे. तरच या व्हायरसवर नियंत्रण मिळवणं शक्य होऊ शकतं असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. जगभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर सात लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांची संख्या ही 21,824,807 वर पोहोचली आहे. तब्बल 773,032 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : चिंता वाढली! कोरोनावर मात केल्यानंतरही रुग्णांना गाठावं लागतंय रुग्णालय

CoronaVirus News : आपलेही झाले परके! ...अन् मुलांवर आली वडिलांचा मृतदेह सायकलवरून नेण्याची वेळ

संसदेच्या अ‍ॅनेक्स इमारतीमध्ये आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश

CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी

CoronaVirus News : आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठं पाऊल! भारताने 5 देशांना निर्यात केले 23 लाख पीपीई किट

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMalaysiaमलेशियाIndiaभारत